जो पर्यंत आशावाद जिंवत आहे तोपर्यंत कोरोना विरोधात लढण्याची जिद्द कमी होता कामा नये - धैर्यशील मोहिते पाटील जागतिक आरोग्य दिना निमित्त केले आवाहन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2020

जो पर्यंत आशावाद जिंवत आहे तोपर्यंत कोरोना विरोधात लढण्याची जिद्द कमी होता कामा नये - धैर्यशील मोहिते पाटील जागतिक आरोग्य दिना निमित्त केले आवाहन.

जो पर्यंत आशावाद जिंवत आहे तोपर्यंत कोरोना विरोधात लढण्याची जिद्द कमी होता कामा नये  - धैर्यशील मोहिते पाटील
जागतिक आरोग्य दिना निमित्त केले आवाहन.

अकलूज ; दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. आज आपण जागतिक आरोग्य दिवस साजरा करत असताना कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना सर्व जगाला करावा लागेल यांची कल्पना सुद्धा कुणी केली नसेल.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखणे हा मोठा चिंतेचा विषय आहे. मात्र जोपर्यंत जिंकण्याचा आशावाद जिवंत आहे तोपर्यंत लढण्याची जिद्द कमी होता कामा नये, सगळेच युध्द  सीमेवर लढले जात नाहीत काही संयम ठेऊन लढावे  लागतात आणि हे कोरोना वायरस विरोधातील युद्ध आपल्या सर्वांना  संयमाने अन घरी थांबूनच लढायचे आहे हा संदेश धैर्यशील मोहिते पाटील यांनी जनतेला दिला.

धैर्यशील मोहिते पाटील पुढे म्हणाले  आपल्याला या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या हिंमतीने लढायचे आहे.सामान्यपणे कोरोना व्हायरस एका संक्रमित व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्यासोबतच मोकळ्या हवेत खोकल्याने किंवा शिंकल्याने, संक्रमित व्यक्तीसोबत हात मिळवल्याने किंवा त्यांना गळाभेट घेतल्याने तसेच त्यांनी वापरलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने हा व्हायरस परसतो त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घतेली पाहीजे व कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी आणि तो आणखी पसरू नये यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

जो पर्यंत आशावाद जिंवत आहे तोपर्यंत कोरोना विरोधात जिद्दीने लढूयात मानवजातीवर आलेल्या कोरोना रूपी संकटावर विजय प्राप्त करूयात हाच जागतिक आरोग्य दिना निमित्त सगळ्यांनी मिळून संकल्प करूया असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages