लॉकडाऊन मुळे गरजूंना आधार सोशल फौंडेशन मार्फत धान्य वाटप करण्यात आले
कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन मुळे गरजूंना आधार सोशल फौंडेशन मार्फत धान्य वाटप करण्यात आले व कोरोनामुक्त अभियान राबविण्यात आले. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून आधार सोशल फौंडेशन तर्फे हातावर पोट असणारे कुटुंब,विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बिगारी, रोजंदारी कामगार, मजूर, ज्या लोकांनकड़े रेशनकार्ड नाही. अत्यंत गरजवंत कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले. अश्या लोकांच्या जेवणाची खूपच अडचण होत आहे याचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला. धान्याचे किट मध्ये गव्हाचं पीठ 02 kg, तांदूळ 03 kg, तेल अर्धा kg, मसूर डाळ अर्धा kg, तिखट, मीठ, बिस्कीट इ. धान्य वाटप हे विजय नगर, नीलम नगर, वज्रेश्वरी नगर, श्वेता नगर, शांती नगर झोपडपट्टी परिसरातील गोर गरीब लोकांना वाटप करण्यात आले. यावेळी आधार सोशल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद माने, हणमंत साळुंखे, गिरीश दुलंगे, राकेश कोरचगाव, अमोग राजमाने, श्रीनाथ श्रीगण, मनोज भाजीभाकरे, मंजुनाथ चिंचोळी, मल्लू जाधव, नागेश बेनुरकर आदी उपस्थित होते



0 Comments