स्नेहालयात भगवान महावीर जयंती साजरी...
सोलापूर दि.६ स्नेहालय सामाजिक विश्वस्त संस्था कारंबा ता उ.सोलापूर येथे भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम भगवान महावीर स्वामीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. जगभरात पसरत असलेला कोरोना संसर्गजन्य व्हायरस जगापासून मुक्त यासाठी स्नेहालयतील प्रतिनिधी व बालकांनी णंमोकार महामंत्र व गायत्री मंत्राचा जाप करण्यात आला.
यावेळी स्नेहालयातील कु.निर्जला व कु.प्रिती यांनी पंचशील सिध्दांताचे महत्व सांगत अहिंसा परमोधर्म हा जगात एकमेव धर्म आहे. तसेच कु.संजना हिने भगवान महावीर स्वामीचे विविध स्तवनाचे पठण केले. कु.छाया हिने कोरोना संसर्गजन्य व्हायरस संपूर्ण जगभरातून मुक्त व्हावा याकरिता गीत गायले. यामध्ये तिने पोलीस, जवान, पत्रकार बंधू यांच्याबद्दल पुढीलप्रमाणे विशेष वाक्य संबोधले तुम्ही बसावे म्हणून जे बाहेर बसून जेवताहेत त्या बच्चीच्या व वडीलांच्या मनातील भाव काय असतील हो, विचार करा, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असे बोलताना तिचे आश्रु अनावर झाले.
संस्थापक अध्यक्ष प्रदिपकुमार शिंगवी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महावीर जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सह.व्यवस्थापिका योगिता डाके, अधिक्षक विकास वाघमोडे, रेखा घोळवे, समुपदेशक रविंद्र गडदे, अर्चना शिंदे, नविनचंद्र म्हेत्री व स्नेहालयातील बालके उपस्थित होती.

0 Comments