टेंभुर्णी(प्रतिनिधी) जीवघेण्या कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस उन्हातानात रस्त्यावर थांबून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून पत्रकर आबासाहेब साळुंखे यांच्या वतीने 35 पोलीस कर्मचाऱ्यांना खरबुजाचे वाटप करण्यात आले
गेल्या तीन दिवसापासून उष्णतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असतानाही पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर पुणे -सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर प्रवेश बंदी करून कोरोना रोगापासून सोलापूर जिल्ह्याचे रक्षण करण्याचे काम भिमानगर येथे हे पोलिस करत आहेत त्यांच्या या कामाचे कौतुक करेल तेवढे कमी आहे त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून थोडासा थंडावा निर्माण होण्यासाठी पत्रकार आबासाहेब साळुंखे यांच्या शेतातील खरबुजाचे वाटप पत्रकार आबासाहेब साळुंखे व संतोष पाटील यांच्या कडून पस्तीस पोलीस कर्मचाऱ्यांना करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे पोलीस निरीक्षक आर टी ओ मुरकुटे, उप पोलीस निरीक्षक वाघमारे, अशोक बाबर आधी 35 पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते
0 Comments