Hot Posts

6/recent/ticker-posts

एक लाख तीस हजार लिटर सॅनिटायझरचे जिल्ह्यामध्ये दररोज होणार उत्पादन

क लाख तीस हजार लिटर सॅनिटायझरचे
जिल्ह्यामध्ये  दररोज होणार उत्पादन

            सोलापूर, दि. 10 – सोलापूर जिल्ह्यातील आठ डिस्टिलरी आणि तीन भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून या बारा कारखान्यातून आता दररोज एक लाख तीस हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन होईल.
            याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यात सॅनिटायझर अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे सॅनिटायझरची निर्मिती वाढविण्यास सांगण्यात आले होते. यापैकी जिल्ह्यात असणारे मद्य निर्मिती कारखाने आणि डिस्टिलरी यांना सॅनिटायझरची निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली. अल्कोहोल चा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा दरही निश्चित करण्यात आला आहे.  
            सॅनिटायझरची निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आलेल्या प्रकल्पांची नावे आणि दररोजची निर्मिती क्षमता पुढीलप्रमाणे - 1) मे. ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरी लिमिटेड, श्रीपूर, ता. माळशिरस, 6000 लिटर           2) मे. विष्णूलक्ष्मी को-ऑपरेटिव ग्रेप डिस्टलरी  एमआयडीसी अक्कलकोट रोड, 10000 बी. एल.  3) मे. विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेल, म्हैसगाव, ता. माढा, 30000 बी. आय. 4) मे. फॅबटेक सूगर प्रॅाईवेट लिमिटेड, नंदून बालाजीनगर, ता. मंगळवेढा, 30000 बी.एल. 5) मे. जकराया सुगर लिमिटेड, वटवटे, ता. मोहोळ, 10000 बी.एल 6) मे. युटोपियन सुगर लिमिटेड, पतंगनगर, कचरेवाडी, ता. मंगळवेढा, 10000 बी. एल. 7) मे. खंडोबा डिस्टलरी प्रायवेट लिमिटेड, टेंभूर्णी ता. माढा, 10000 बी. एल. 8) मे. लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड सुभाषनगर, ता. उत्तर सोलापूर, 10000 बी.एल. 9) मे. विठ्ठलराव शिंदे एस एस के लिमिटेड, गंगामाई नगर, पिंपळनेर, ता. माढा, 10000 बी.एल. 10) मे. श्री. पांडुरंग एसएसके लिमिटेड श्रीरपूर, ता. माळशिरस, 5000 बी.एल. आणि  11) मे. श्री. सिध्देश्वर एसएसके लिमिटेड कुमठे, सोलापूर, 500 बी. एल.
Reactions

Post a Comment

0 Comments