खरेदी विक्री संघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अकलूज ( प्रतिनिधी ) माळशिरस तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा वतीने दिडशे गोरगरीब लोकांना अन्नधान्यासह जीवनाश्यक वस्तुचे वाटप करण्यात आल्याची माहिती संघाचे व्हाइस चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांनी दिली. तालुक्यातील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील , सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, तसेच माजी खा.भाजपाचे नेते रणजीतसिह मोहिते-पाटील यांचा सूचनेवरून १५० लोकांना डाळ, तांदूळ, तिखट, साबण , अशा जीवनावश्यक वस्तुंचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम सोलनकर व व्हाइस चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांचे हस्ते आज अकलूज शहरातील संघाच्या कार्यालयासमोर वाटप करण्यात आले.याप्रसंगी व्यवस्थापक नामदेवराव गोरे यांच्या सह संस्थेचे संचालक उपस्थित होते.
0 Comments