श्रीराज युवा मंचच्या वतीने गरीब कुटुंबियांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अकलूज( प्रतिनिधी ) माळशिरस तालुका श्रीराज युवा मंच यांचे वतीने संग्रामनगर अकलूज येथील 250 गरीब कुटुंबियांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप श्रीराज नंदकुमार माने पाटील यांच्या वतीने करण्यात आले.
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून श्रीराज युवा मंचच्या वतीने अल्प उत्पन्न गरीब कुटुंबियांना मोफत जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्यात आले. यामध्ये गहु, तांदूळ, साखर , चहा, मसूर, डाळ हरभरा, गोडेतेल, या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.तसेच 250 कुंटुबातील लहान मुंलाना बिस्किट पुढे वाटप करण्यात आले. यावेळी संग्रामनगरच्या सरपंच राजवर्धनी श्रीराज माने-पाटील, श्रीराज युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्रीराज नंदकुमार माने पाटील, पंटु व्यवहारे,बापू तोरणे, पप्पू तोरणे, निखिल पवार व त्यांचे सर्व सदस्य यांनी वस्तूचे वाटप केले.
0 Comments