महाराष्ट्रात ४७ नवे रूग्ण; राज्यात करोनाबाधितांची संख्या 537वर
मुंबई - महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून आज 67 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 43 रुग्ण मुंबई , 10 मुंबई परिसर, पुणे 9 व नगरच्या 3 रुग्णांसह वाशीम, रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या 537 तर मृतांची संख्या 27 झाली आहे. दरम्यान, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि शंभर टक्के लॉकडाऊन झाले नसल्यामुळे पुन्हा झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. दररोज, तीन ते चार या संख्येने रुग्ण वाढत असताना मागील दोन दिवसांत ही संख्या आता सात ते आठ या पटीत वाढू लागली आहे.
0 Comments