पुणे विभागात 31 हजार 884 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 726 क्विंटल भाजीपाल्याची आवक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 21, 2020

पुणे विभागात 31 हजार 884 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 726 क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे विभागात 31 हजार 884 क्विंटल अन्नधान्याची तर
8 हजार 726 क्विंटल भाजीपाल्याची आवक
                                                      -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

        पुणे, दि.20 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 31 हजार 884 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 726 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 634 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 17 हजार 619 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 20 एप्रिल 2020 रोजी 98.272 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.627 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात 1 लाख 23 हजार 808 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 96 हजार 340 मजुरांना भोजन
       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 147 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 1 हजार 92 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 1 हजार 239 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 लाख 23 हजार 808 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 96 हजार 340 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages