माळशिरस तालुक्यासाठी 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 1 कोटी 10 लाखाचा निधी मंजूर - आ.बबनदादा शिंदे
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यामधील गावांतील गावाअंतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेतंर्गत विकासकामे करणे करीता समाविष्ठ असलेल्या ग्रामीण भागातील कामासाठी 1 कोटी 10 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रमुख गाव ते वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे . तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार दुरुस्ती करणे या सारखी अनेक विकास कामे करणेकरीता शासनाकडे निधी मिळणेसाठी वेळोवेळी मागणी केलेली होती. त्यानुसार शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ माळशिरस तालुक्यातील विकास कामासाठी 1 कोटी 10 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहे.
यामध्ये माळशिरस तालुक्यातील महाळुंग - रक्कम रू. 30 लाख, बोरगांव रक्कम रू. 10 लाख, माळेवाडी - रक्कम रु. 10 लाख, माळखांबी - रक्कम रु. 10 लाख, विठ्ठलवाडी - रक्कम रु. 10 लाख, जांभूड - रक्कम रु. 10 लाख, नेवरे - रक्कम रू. 10 लाख, मिरे - रक्कम रू. 10 लाख, खळवे - रक्कम रु. 10 लाख असा एकुण 1 कोटी 10 लाख रूपयांचा निधी विकास कामासाठी मंजूर झालेला आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावचा विकास करणे करीता या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत श्रीपूर येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणेसाठी सामाजिक न्याय खातेकडून रक्कम रु. 15 लाख निधी मंजूर करणेत आलेला आहे.
सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंढे यांच्या सहकार्यामुळे निधीची तरतुदी झाली असल्याने मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार असून मंजूर झालेली कामे करण्यात येणार असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.
0 Comments