कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे
22 लाख रुपयांची मदत
सोलापूर दि. 7 : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 22 लाख रुपयांची मदत देण्यात आली. आमदार तथा सभापती विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे 22 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपसभापती श्रीशैल नरोळे, माजी आमदार दिलीप माने, बाळासाहेब शेळके, केदार उबंरजे उपस्थित होते. बाजार समितीमार्फत स्थलांतरित मजूर आणि गरजुंना गरजुंना अन्न धान्य देखील पुरविण्यात येत आहे.

0 Comments