Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवदारे परिवारातील संस्थांकडून सहा लाख 82 हजारांची मदत

शिवदारे परिवारातील संस्थांकडून
सहा लाख 82 हजारांची मदत

        सोलापूर, दि. 7 -  कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपले योगदान दिले. शिवदारे परिवारातील विविध संस्थांकडून 6 लाख 82 हजार रुपयांचे  धनादेश मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यामध्ये दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाने एक लाख दहा हजार रुपये, वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानकडून एक लाख दहा हजार रुपये, राजशेखर शिवदारे कुटूंबिय यांच्याकडून 51 हजार रुपये, सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेकडून 1 लाख 50 हजार रुपये, सोलापूर सिध्देश्वर सहकरी बँक सेवक वर्ग  यांच्याकडून  एक लाख 40 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला व पंतप्रधान निधीसाठी सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक सेवक वर्ग यांच्याकडून एक लाख 40 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. एकूण सहा लाख 82 हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले, उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे, माजी अध्यक्ष सुभाष मुनाळे, सरव्यवस्थापक आर. बी. शर्मा, चंद्रकांत म्हेत्रे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments