Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील पंचवीस हजार NRHM अंतर्गत आरोग्य कर्मचारी करणार कामबंद आंदोलन--कुंडलिक आलदर

राज्यातील पंचवीस हजार NRHM अंतर्गत आरोग्य कर्मचारी करणार कामबंद आंदोलन--कुंडलिक आलदर

सांगोला (प्रतिनिधी) -राज्यातील आरोग्य विभागमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी 2005 पासून  आरोग्य विभागात कंत्राटी अधिकारी व कर्मचारी म्हणून निस्वार्थी भावनेने सेवा बजावीत आहेत,पण या कर्मचाऱ्याकडे ना शासनाचे लक्ष ना संबंधित प्रशासनाचे लक्ष, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य  अभियानातील अधिकारी व कर्मचारी सतरा मार्च 2020 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे कामबंद आंदोलन करणार असून या आंदोलनात राज्यातील 25000 कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष कुंडलिक आलदर यांनी निवेदनाद्वारे दिली.राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण अभियान सांगोला विभागाच्या वतीने सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार तथा शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख व मा जी आ दीपक आबा साळुंखे पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे,शैक्षणिक पात्रतेनुसार समकक्ष पदावर नियमित करणे,समान काम समान वेतन लागू करणे,वयोमर्यादा शिथिल करणे,भरती प्रक्रियेत 40 टक्के आरक्षण देणे,आदि विविध मागण्यांसाठी एन. आर.एच.एम.संघटनेच्या वतीने दिले.यापूर्वी ही मा आयुक्त आरोग्य सेवा व संचालक,व राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे विविध मागण्यांची निवेदने  दिलेली आहेत,या मागणी कडे विशेष लक्ष वेधण्यासाठी आणि या मागणीची पूर्तता व्हावी,यासाठी राज्यातील कर्मचारी 17 मार्च रोजी आझाद मैदान  येथे आंदोलन करणार आहेत.सदर निवेदन देते वेळी आरोग्य विभागातील तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ रमेश अंधारे, आरोग्य सहायिका भारती भोसले,रंजना जगताप, आरोग्य सेविका वर्षाराणी अंकुशराव,सविता रुपनर,ताई येलपले,वनिता गाडे,अंजिता कुंभार,अरुणा गावसे आदी कर्मचारी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.हे आंदोलन संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कासार,राज्याध्यक्षा कुंदा सहारे ,उपाध्यक्ष स्वप्नील गोसावी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे, तरी राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments