Hot Posts

6/recent/ticker-posts

उदयनगर येथे महिलादिना निमित्त रणरागिणी महिलांचा सन्मान

उदयनगर येथे महिलादिना निमित्त रणरागिणी महिलांचा सन्मान
अकलूज( प्रतिनिधी )उदयनगर तालुका माळशिरस येथील एकता फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला रणरागिणींचा सन्मान सोहळा  आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रम उदयनगर येथील  सभा मंडपामध्ये पार पडला. यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सिद मॅडम तसेच डाॅ सिद, तसेच सोलापूर जि. प. सदस्या सुनंदा फुले, अकलूजच्या पीएसआय सारिका शिंदे मॅडम, तांबोळी मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी मॅडम, डाॅ अपर्णा एकतपुरे,  तसेच आशा सेविका वैशाली शिंदे, दीपाली कांबळे,चौंडेश्वरीवाडीचे  ग्रामपंचायत सदस्या शीला गायकवाड, सुवर्णा नन्नवरे,  तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य  लीना गांधी, ईशा पोळखे, दीपाली कांबळे , आदी महीलांचा सन्मान करण्यात आला. एकता फाऊंडेशनच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच मागील वर्षी कोल्हापूर सांगली भागात जाऊन पूरग्रस्ताना मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या विचारांना चालना देण्याचे काम या एकता फाऊंडेशनच्यावतीने केले जाते व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता फाउंडेशनच्या अध्यक्षा खजाबी जमादार मॅडम यांनी केले व आभार  माजी सरपंच सतिश शिंदे यांनी केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  पुजा गायकवाड, प्रिया सोनवणे,  मालन जमादार ,आशाबी शेख, संगीता सोनवणे, काजल खरे, प्रिती सोनवणे, सुषमा शिंदे, करिष्मा शिंदे, लालासाहेब जमादार,सचिन सोनवणे सर, कीशोर गायकवाड, सागर शिंदे, अवधूत कांबळे ,विकास जवंजाळ सर,आदींनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments