पक्षांसाठी पाण्याची भांडी तयार करा, बक्षीस मिळवा! पक्षी प्रेमी ग्रुप तर्फे स्पर्धेचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) - २० मार्च "जागतिक चिमणी दिवसानिमित्त" पक्षीप्रेमी ग्रुप सांगोला यांच्यावतीने यावर्षी पक्ष्यासाठी टाकाऊ वस्तूपासून चारा, पाण्याची भांडी तयार करण्याची स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रु, 700, द्वितीय क्र. रु 500 ₹, तृतीय क्र. रु. 300 व उत्तेजनार्थ 150 रु. ची दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा २० मार्च रोजी दुपारी 3,30 वाजता घेण्यात येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही भांडी घरी तयार करून स्पर्धेच्या ठिकाणी ( डॉ.प्रभाकर माळी यांच्या म. फुले संकुल, म. फुले चौक, सांगोला ) येथे आणायची आहेत. स्पर्धकांनी त्यासाठी १८ मार्च पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी अमेय मस्के (९७६७१७०७०७), राजेंद्र यादव (९०११७०७०८०), महेश गुरव (९५०३५१०४०४), सीताराम पाटील (९९२३५३४९९७) प्रा. डॉ. विधिन कांबळे (८३२९०५६६८५) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे पक्षी प्रेमी ग्रुपच्या वतीने पक्ष्यांची घरटी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून एका घरट्याची किंमत रु 30 असणार आहे. ज्यांना कुणाला हवी असतील त्यांनी नाव नोंदणी करावी. १६ मार्च पासून घरटी उपलब्ध करून दिली जातील.
0 Comments