"पुस्तकवाचन आणि वाचनाचे बदलते स्वरूप"...
जगण्या वागण्याचे संदर्भ निमिषात बदलणाऱ्या संक्रमणाच्या काळात आपण जगतोय, क्षणापूर्वीच जगणं लगेच कात टाकून पुन्हा 'नवीन'काय च्या शोधात सारी मानवजात गोल गोल फिरत आहे. अशा या वेगाच्या अवर्तनात फिरत असताना जगण्याला खऱ्या अर्थाने स्थिरत्व आणि शांतता प्रत्येकजण आपआपल्या परीने शोधत आहे. इतकं जगणं fast (फास्ट)आणि wast (वास्ट) झालं आहे मोबाइलच्या एका स्क्रोल वर इतकी माहिती, ज्ञान उपलब्ध आहे.की शोधत असताना नक्की आपल्याला काय हवं आहे याचं भान सुटत चाललं आहे. आपण नवीन काही च्या शोधात,त्या नादात नुसते वाहत आहोत. हे थांबवायच असेल तर विचार स्थिर हवेत. आणि त्यासाठी पुस्तकाशिवाय पर्याय नाही. हा माझा 'स्वानुभव' आहे. विशिष्ट विषयांची पुस्तक वाचत असताना तुमच्या विचारांना एक चिंतनशील स्थिरत्व येत जात. आकलन क्षमता वाढत जाते. मोबाईलवर महिती मिळवत असताना तुम्ही नुसते वाहत जाता. आणि मग माहितीच्या ढिगाऱ्याखाली तुमचं खुरट् बोन्साय कधी होत हे लक्षात ही येत नाही. हे थांबणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी वाचनाला पर्याय नाही हे तितकंच सत्य आहे.मध्यंतरी "सौमित्र" या प्रसिद्ध कवी ची "पुस्तक" नावाची कविता वाचनात आली होती.कवितेतील बापाजवळ आपल्या मुलाला देण्यासाठी स्थावर मालमत्ता अशी काहीच नाही. मुलाला देण्यासाठी आहेत ती फक्त 'पुस्तक'.ती पुस्तकचं मुलाचा भविष्यकाळ घडवू शकतात. तेव्हा आपल्या मुलाने ती पुस्तकं वाचावीत अशी त्या बापाची खूप इच्छा असते.तो कवितेत म्हणतो ही पुस्तक तुला वाट दाखवतील,चालवतील, थांबवतील, बोलत करतील, संभ्रमात टाकतील, तरवतील, अडवतील, घडवतील, वेळप्रसंगी तुडवतील, हरवतील,सापडतील, तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं.. इतकं प्रवाही पुस्तकाचं महत्व आपल्या लक्षात येतं.
जगात असंख्य उदाहरणे आहेत की ज्यांची 'आयुष्य' ही पुस्तकांमुळे घडवली गेली आहेत. त्यात जगजेत्या 'सिकंदरपासून' ते प्रत्येक यशस्वी व्यक्तीपर्यंतचे इतिहास आपल्याला माहीत आहेत.'डॉ.आंबेडकर'आणि 'पुस्तक' हे फार मोठं समीकरण आहे. केवळ वाचनाने माणूस इतका मोठा होऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे"डॉ. बाबासाहेब".बाबासाहेबांचं वाचन दांडग होतं. प्रचंड अभ्यास होता तरी ते म्हणायचे ज्ञानाचा सागर अमर्याद आहे. आणि त्या सागरात आता कुठे माझे पाय ओले झाले आहेत.अजून खूप वाचणे आहे, ज्ञान मिळवणे आहे. इतकं वाचनाचं महत्व डॉ. बाबासाहेब विशद करतात .आपल्याकडची साहित्यपरंपरा तर अगाध आहे. प्रत्येक साहित्य प्रकारानुसार कथा कादंबरी, काव्य,नाटकं, चरित्र, निबंध,संतसाहित्य, स्त्रीसाहित्य, दलित साहित्य, ललित असे त्या त्या काळातील असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. व. पु. काळे यांनी एके ठिकाणी म्हंटल आहे की "दासबोध" या ग्रंथानंतर एक ही ग्रंथ किंवा पुस्तक छापलं नसतं तरी नुसत्या दासबोधावर संपूर्ण मानवजात तरली असती. इतकं जीवनावश्यक सार 'दासबोध'या ग्रंथात आहे. वि. स. खांडेकर यांनी ही म्हंटल होत की मीअख्ख आयुष्य आनंदाने एखाद्या 'निर्जन' बेटावर काढायला तयार आहे पण सोबतीला पुस्तक असतील तर. त्यातल्या त्यात "खलील जिब्रानची' पुस्तकं असतील तर आनंदाच. इतकं वाचनप्रेम आणि महत्व अधोरेखित करणारी व्यक्तीमत्त्व आपल्या कडे आहेत ही किती भाग्याची गोष्ट आहे .अनेकांची आयुष्य या पुस्तकांमुळे घडत गेली. संपूर्ण जगतावर इतकं साहित्य आणि वाचनीय गोष्टी उपलब्ध आहेत की कितीतरी जन्म घेतले तरी पूर्णत्वास जाणार नाही.इतकं ते अफाट आहे.कुसुमाग्रज यांच्या "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा"या दोन ओळी आज ही जगणं शिकवितात. इतकी ताकद या वाचनात आहे.आपली वाचन संस्कृती तर अफाट आहे . संतसाहित्य अगदी श्रीचक्रधर स्वामी पासून अनेक बखरी, इतिहासकार,त्यांची ग्रंथ संपदा प्रचंड आहे.. अनेक साहित्य नवीन प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. गुरुवर्य रविंद्र टागोर यांच्या पासून ते बाळशास्त्री जांभेकर, रानडे, अश्या स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळातील लेखकाचं लिखाण ही उपलब्ध आहे. नंतरच्या काळात ना.सी. फडके, गदिमा,वि.स.खांडेकर. प्र.के. अत्रे,पु. ल. दलित साहित्य कार दया पवार, नामदेव ढसाळ पर्यत ते आज घडीला तरुणाईला आवडणारे चेतन भगत, अच्युत गोडबोले यांच्या लिखाण पर्यत.असे अनेक प्रवाह वाचनासाठी उपलब्ध आहे.स्त्री आणि साहित्य यावर तर एक वेगळाच आणि समृद्ध विचारप्रवाह तयार होऊ शकतो.अगदी स्त्रीसंत जनाबाई पासून ते ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी दुर्गा भागवत, इरावती कर्वे,अरुणा ढेरे यांची अनेक पुस्तक उपलब्ध आहेत.तसेच इतर भाषेतील अनुवादित साहित्य ही आपल्याकडे उपलब्ध आहे.. कोवे,ब्रायन ट्रेसी, रॉबिन शर्मा,एलिस, बाबरा, अशी फॉरेन लँग्वेज मधील साहित्य ही उपलब्ध आहेत..हे लिहीत असतानाच जाणवत आहे की वाचन हा प्रवास नाही तर मोठा प्रवाह आहे. जितकं लिहावं तितकं थोडंच आहे... अनेक पुस्तकापासून सुरू झालेला हा प्रवास इथं पर्यत घेऊनयेतो आपल्याला.सुरवातीला म्हंटल त्याप्रमाणे या online(ऑनलाईन) च्या दुनियेत पुस्तक वाचन टिकाव धरेल? अस बऱ्याचदा विचारलं जात,तर याचं उत्तर "हो "असंच आहे. कारण ज्ञान मिळवण्याचे मार्ग बदलले आहेत. पुस्तकांचे वाचनाचे स्वरूप बदलले असले तरी वाचकवर्ग प्रतिसाद कमी झाला आहे असे मुळीच वाटतं नाही.. एका क्लिक वर सगळं उपलब्ध आहे फक्त काय वाचावं, किती वाचावं,कसं वाचावं, वाचलेलं कसं मांडावं, आयुष्यात कसं साठवावे आणि कसं जगावं हे कळलं पाहिजे आणि पुन्हा हे सगळं पुस्तकातूनच शिकता येत.आज( full reader)फुल रीडर,अनेक वाचन अँप (app)वर वाचता येतं.. pdf स्वरूपात वाचता येतं.अनेक app वर बोलती पुस्तक उपलब्ध आहे.स्टोरीटेल अँप वर अनेक पुस्तक वाचता येतात..आताच्या छोट्या मुलांसाठी हे गोष्टीची अँप उपयोगी आहेतच..सध्या जगाबरोबर चालायचे आहे तेव्हा या online (ऑनलाईन)पुस्तकांची ओळख असणं फार गरजेचे आहे.. व्यवाहारातील व्यापार, कृषी, व्यवसाय, गुंतवणूक, मालमत्ता माहिती, खरेदी विक्री यासंदर्भात ही माहिती करून देण्याच काम पुस्तकच करुन देतात.. मग ती online का असेना.. याची प्रत्येकाने कास धरणे आवश्यक आहे.. शेवटी प्रचंड वेगाच्या जगण्यात डामडौल, दिखावा, चैन, चंगळवाद, या हव्यासापोटी पुस्तकांना घरात थारा नाही पण पुस्तक जगणं शिकवतात हे नक्की... "भाकरीसाठी पुस्तक नाहीत विकता येतं पण भाकरी कशी कमवावी हे मात्र पुस्तकचं शिकवतात ".वाचन चळवळ वाढावी, म्हणून अनेक प्रयत्न सुरू आहेत. ग्रंथप्रदर्शन, साहित्यविषयक विविध कार्यक्रम.डिजिटल वाचन,वाचनाचे online पर्याय,ग्रंथालयाचे महत्व.अश्या अनेक गोष्टीतून वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.. ते तसेच उत्तरोत्तर वाढत जावो... हीच आशा...
0 Comments