Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवकृपा सहकारी पतपेढी शाखा सांगोला यांचेवतीने महिला मेळावा संपन्न.

शिवकृपा सहकारी पतपेढी शाखा सांगोला यांचेवतीने महिला मेळावा संपन्न.



      सांगोला :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील आदर्श व अग्रगण्य अशा शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई, शाखा सांगोला या शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा महिला मेळावा आणि सत्कार समारंभ संपन्न झाला. संस्थेच्या सर्वांगीण प्रगती मध्ये, संस्थेच्या महिला सभासद, महिला ठेवीदार ,महिला ग्राहक व महिला हितचिंतक यांचा मोठा वाटा आहे, म्हणून संस्थेने आठ मार्च रोजी महिला दिन भव्य स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले. यावेळी या महिला दिनाच्या निमित्ताने सांगोला शाखेच्यावतीने पीएसआय प्रनोती यादव, आदर्श सरपंच शशिकला बाबर, डॉ. जीवनमुक्ती डोंबे ऍड मोहिते मॅडम,वर्षा साळुंके मॅडम,उद्योजिका निता ढोबळे, सुमन कबाडे, उज्वला कोडग, प्रतिभा माळी, अरुणा पाटील, शामल देशपांडे, माजी सभापती सुरेखा सूर्यगण, आदि महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच शशिकला बाबर , पीएसआय प्रणोती यादव, एडवोकेट मोहिते, माजी सभापती सुरेखा सूर्यगण, यांनी आपल्या या सत्काराला उत्तर देताना जागतिक महिला दिनाचा हा शिवकृपा सहकारी पतपेढीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून या शाखेच्या सर्व संचालक मंडळाचे आणि प्रशासकीय स्टाफ चे अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक ज्ञानदेव बुधे यांनी केले.महिला दिनाचे महत्व प्रभाकर माने यांनी सांगितले. सूत्रसंचालन तानाजी सावंत यांनी व्यक्त केले, तर आभार पांडुरंग गायकवाड यांनी मानले. सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार, संस्थापक चंद्रकांत वंजारी,उपाध्यक्ष वसंत चव्हाण तसेच सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला सभासद,उपस्थित होत्या.


Reactions

Post a Comment

0 Comments