Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज नगरीत शाहीर सम्राटांचा महाजल्लोष

अकलूज नगरीत शाहीर सम्राटांचा महाजल्लोष
(सांगलीचे शाहिर प्रसाद विभुते ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी )


अकलूज (प्रतिनिधी ) :-आपल्या दमदार आणि पहाडी आवाजात महापुरुषांचा इतिहास सांगत राज्यातल्या शाहीर सम्राटांचा महाजल्लोष अकलूजच्या सहकार नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत शाहीर स्पर्धकांनी शाहिरींचे सादरीकरण केले. तर या स्पर्धेत सांगलीचे शाहीर प्रसाद विभूते हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त छत्रपती शिवजयंती मध्यवर्ती महोत्सव समिती माळशिरस तालुका यांच्या वतीने शिवजयंती सोहळा शाहिरी स्पर्धेचे व परिषदेचे आयोजन विजय चौक अकलूज येथे करण्यात आले होते. यामध्ये सांगलीचे शाहिर प्रसाद विभुते हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले यांना रोख रक्कम 31 हजार रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर शाहीर शुभम विभूते यांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्यांना रोख रक्कम 21हजार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व संपूर्ण कपड्याचा आहेर त्यांचा देऊन सन्मान केला.तृतीय क्रमांक शाहीर सुभाष गोरे यांनी मिळवला त्यांना रोख रक्कम 15हजार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व संपूर्ण कपड्याचा आहेर तर चतुर्थ क्रमांक  बालशाहीर अविष्कार यांने मिळवला त्यास रोख रक्कम 5हजार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आहेर देऊन सन्मानित केले.व्यक्तिगत बक्षिसे - उत्कृष्ट संबळ वादन किरण गायकवाड रोख बक्षीस पंधराशे रुपये, उत्कृष्ट ढोलकीपटू नाना कांबळे रोख बक्षीस पंधराशे रुपये, उत्कृष्ट ढोलकीपटू राजू घोलप रोख बक्षीस पंधराशे रुपये, उत्कृष्ट हार्मोनियम प्रल्हाद यादव रोख बक्षीस पंधराशे रुपये, उत्कृष्ट कोरम फकीरा पवार पंधराशे रुपये, प्रतीक्षा भुतकर पंधराशे रुपये, या सर्व स्पर्धकांना छत्रपती शिवजयंती मध्यवर्ती महोत्सव समिती माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी रोख रक्कम स्मृतिचिन्ह व संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन सन्मानित केले.प्रारंभी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर सहकार महर्षी काकासाहेब व आक्कासाहेब तसेच लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तर शाहीर स्पर्धेचे उद्घाटन सचिन भाऊ साठे, अमर पुणेकर, अतुल देशमुख, शाहीर अवधूत विभुते, नंदकुमार पाटील, शाहिर आदिनाथ विभूते, शाहीर आलम बागणीकर ,शाहिरा अनिता खरात, शाहीर संदेश उमप, यांच्या हस्ते करण्यात आले तर सत्कारमूर्ती शाहीर बापूसाहेब पवार, शाहीर शांताराम धनावडे, शाहीर शिवाजीराव पाटील, शाहीर नंदकुमार पाटोळे, शाहीर प्रभाकर तासगावकर ,शाहीर जयवंत रणदिवे, शाहीर गौतम सपकाळ, शाहीर सुभाष गोरे, आदींचा सन्मान डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मोठ्या थाटात केला. तर निशिकांतराजे जाधव, सिद्धार्थ कंक, दादारावराजे जाधव ,आनंदराव काशीद, मिलिंद शिरसागर आदींचा सन्मान हे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केला. यावेळी फत्तेसिंह माने पाटील,  हिंदुराव माने पाटील, अण्णासाहेब इनामदार, सतीश नाना पालकर मच्छिंद्र ठवरे, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब धाइंजे, मारुती पाटील, किरण साठे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर राजेंद्र कांबळे,सुधीर रस्ते, अण्णासाहेब शिंदे, गणेश महाडिक, मयूर माने, ज्योतीताई कुंभार, यांच्यासह छत्रपती शिवजयंती मध्यवर्ती महोत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य , जनसेवा संघटनेचे पदाधिकारी  आदींनी अधिक परिश्रम घेतले. प्रास्ताविक शाहीर राजेंद्र कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय जाधव कोल्हापूर यांनी केले.चौकट उद्घाटन प्रसंगी बोलताना  सचिनभाऊ साठे म्हणाले की महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहीरांचे मोठे योगदान आहे. त्यांना मानसन्मान मिळत नाही पण डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातल्या शाहिरांची स्पर्धा व परिषद भरवून त्यांचा मानसन्मान केला. शाहिर पोटाची आणि कुटुंबाचे पर्वा न करता महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोचवीत असतात. हे माणसे पोट भरण्यासाठी शाहीरी करीत नाहीत तर रिकाम्या डोक्यात महापुरुषांचे विचार भरण्याचे काम करत असतात असे ते म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments