सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो सराव शिबीर संपन्न
सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे 29 फेब्रुवारी ते 09 मार्च 2020 या दरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो सराव शिबीर संपन्न झाले. या सराव शिबीरामध्ये तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना तायक्वांदो बद्दल अतिशय उत्कृष्ठ सराव करुन घेतला. त्यामुळे त्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर च्यावतीने पंजाब युनिवर्सिटी पटियाला यांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली. ही अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धा 14 ते 17 मार्च 2020 दरम्यान पटीयाला येथे होणार आहे. या सराव शिबीरादरम्यान सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने मोफत निवासाची व खेळाचे मैदानाची सोय केली. या निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. नितीन सोहनी व संघ व्यवस्थापक श्री. अमित घाटुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी यशस्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. दिलिपकुमार इंगवले सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोजकुमार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments