Hot Posts

6/recent/ticker-posts

भीमाच्या कार्यकारी संचालकांनी लेखी आश्वासन देऊन सुद्धा जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार:प्रभाकर देशमुख

भीमाच्या कार्यकारी संचालकांनी लेखी आश्वासन देऊन सुद्धा जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत  लढा चालूच राहणार:प्रभाकर देशमुख

पंढरपूर (प्रतिनिधी) :- 36दिवस झाले असून भीमा कारखान्यासमोर निवृत्त कामगारांच्या व शेतक-यांच्या एफआरपी व ऊसतोडणी वाहतूक भाड्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे जे आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन मागे घेण्यासाठी भीमा शुगरचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे  यांनी प्रभाकर देशमुख यांना मागणी पत्र दिले असून 15एप्रिल 2020 पर्यंत  एन.सी.डी.सी.नवी दिल्ली यांचे कर्ज मंजूर होणार असून ते अंतिम टप्प्यात असल्याचे या पत्रामध्ये नमूद केले आहे. या सर्व बाबींसाठी हे कर्ज मंजूर होणार असून शेतकरी ऊसबीलाची थकीत रक्कम, कामगारांचा थकीत पगार व सेवा निवृत्त कर्मचारांचे तसेच ऊसतोडणी वाहतुकीसह सर्व देणी आम्ही ताबडतोब आदा करणार असल्याचे या पत्रामध्ये तत्परतेने नमूद करण्यात आले आहे. यासाठी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी हे दिले आहे. यावेळी प्रभाकर  देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की; सहा महिन्यांपूर्वी जनहितने भीमा कारखान्यावर शेतक-यांच्या थकीत एफआरपी साठी व कामगारांच्या थकीत वेतनासाठी कारखाना गेट समोर तीन दिवस आंदोलन केले होते त्यावेळेस सुद्धा 1महिन्यात कामगारांची थकीत रक्कम 7कोटी रूपये देऊ  व एफआरपी थकीत रक्कम 13कोटी 30लाख रूपये व दोन वर्षांपूर्वीची वाढीव 150रू रक्कम देतो म्हणून भीमा कारखान्याचे कार्यकारी संचालक रणवरे  यांनी लेखी आश्वासन दिले होते परंतू त्याची अमलबजावणी आजतागायत करण्यात आलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतक-यांच्या, कामगारांच्या व ऊस वाहतुकीदारांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत जनहिते जे आंदोलन चालू आहे ते चालूच राहणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले.यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, द.विभाग जिल्हा उपाध्यक्ष .अण्णासाहेब वाघचौरे, बाबासाहेब ताड, जिल्हा उपाध्यक्ष मा.चंद्रकांत निकम,मोहोळ ता.अध्यक्ष कुमार गोडसे,पंढरपूर ता.अध्यक्ष  सुभाष शेंडगे,संपर्क प्रमुख बाळासाहेब सपाटे, युवक अध्यक्ष नाना मोरे, रणजित जगताप, संजय पवार, अमिर मुजावर, नितीन जरग, उमेश चव्हाण आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments