Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजमध्ये मुस्लिम वधू-वर पालक परिचय मेळावा

अकलूजमध्ये मुस्लिम वधू-वर पालक परिचय मेळावा

अकलूज( प्रतिनिधी) हजरत राजबाग सवार( रह) यांचा उर्स दिनांक १८ मार्च रोजी होत असून, यानिमित्ताने मुस्लिम समाज बांधवांसाठी मुस्लिम वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जावेद तांबोळी यांनी दिली.पुढे बोलताना जावेद तांबोळी म्हणाले कि  मुस्लिम वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले असून दिनांक १८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत हा मेळावा अकलूज ग्रामपंचायतीतील चांगोजीराव आबासाहेब देशमुख सभागृहात पार पडणार आहे. यामध्ये मुलगा मुलगी तसेच घटस्फोटीत महिला पुरुष आदींचा समावेश असणार आहे. तर मेळाव्यात सहभागी होण्याकरिता दोनशे रुपये नोंदणी फी आकारण्यात येणार असून ती एक वर्षासाठी असणार आहे असे  तांबोळी यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments