Hot Posts

6/recent/ticker-posts

बागेचीवाडी येथे विध्यार्थ्यांना दिला स्वच्छतेचा संदेश

बागेचीवाडी येथे विध्यार्थ्यांना दिला स्वच्छतेचा संदेश       
                      
 अकलूज ( प्रतिनिधी ) संस्कृती बहुउद्देशीय संस्था बागेची वाडी अकलूज यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागेचीवाडी या ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात  दक्षता घेण्याबाबत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमध्ये मुलांनी हात कसे स्वच्छ करावेत. जर आपल्याला खोकला असेल तर तोंडावरती रुमाल बांधावा. आजारी व्यक्तीच्या समोर जाऊन बोलू नये. हात कसे धुवावे त्याचे प्रात्यक्षिक यावेळेस देण्यात आले. यावेळेस करोना व्हायरस संदर्भात थोडक्यात माहिती देण्यात आली. शिवाय शाळेतील प्रत्येक मुलाला एक साबण व हातरुमाल या वेळेस भेट देण्यात आला.  यावेळेस  संस्कृती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, पोलीस पाटील शंकर बागङे, अकलूज गावातील प्रतिष्ठित नागरिक सोमनाथ पोतेकर, आरोग्य केंद्राच्या सिस्टर शेख , तांबोळी, शाळेचे मुख्याध्यापक अभिनंदन गायकवाड, शाळेचे सहशिक्षक सिताराम ढेकळे, शिवाय अंगणवाडी शिक्षिका सुरवसे, महाजन
गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments