स्वप्निल व्यवहारेचे MCAER-CET परीक्षेत यश.
करकंब: (ऋषिकेश वाघमारे ) करकंब ता--पंढरपूर येथील स्वप्निल औदुंबर व्यवहारे याने महाराष्ट्र कृषी व शिक्षण परिषद (MCAER-CET)
या परिक्षेत राज्यात 5 क्रमांक(RANK) मिळवून सुयश संपादन केले आहे. तसेच या परीक्षेत त्याने कोल्हापुर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्वप्निल व्यवहारे हा कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ ऍग्रीक्लचर तालसंडे येथे शिकत आहे.त्याने मिळवलेल्या यशाचे श्रेय तो आपल्या आईवडील आणि कॉलेजमधील गुरुजनांना देतो. त्याने या मिळवलेल्या यशाबद्दल करकंब पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments