लक्ष्मीनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकिकरण फवारणी;गावातील नागरिकांनी घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे : सरपंच चांगुणा नरळे
सांगोला (जगन्नाथ साठे) -: आज देश लॉक डॉऊन होऊन पाच दिवस झाले आहेत, लक्ष्मीनगर गावातील लोकांनी घरातच थांबून ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, परजिल्हा ,परराज्यातून गावात आलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायती कडे नोंद करावी,असे आवाहन लक्ष्मीनगर गावच्या सरपंच चांगुणा नरळे यांनी व्यक्त केले. आज लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात आणि वाडया वस्त्यांवर निर्जूतुकिकरण फवारणी करण्यात आली. या वेळी त्यांनी आवाहन केले.
सर्वत्र संचार बंदी आहे,संचार बंदीच्या काळात लोकांनी घरातच रहावे, असे ही सरपंच नरळे यांनी सांगितले.या वेळी उप सरपंच धनाजी नरळे, उद्योगपती नितीन नरळे,गोवर्धन गोडसे, पांडुरंग गोडसे, पोलिस पाटील सोमा नरळे ,कैलास हिप्परकर,ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे,ग्रामपंचायत शिपाई मुबारक मुलाणी, कुंडलिक जावीर,आशा वर्कर,उपस्थित होत्या. कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी गावात स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीचे सदस्य तसेच तलाठी,कृषी सहायक,आरोग्य सेवक,सेक्रेटरी यांनी फवारणी वेळी दांडी मारलेली दिसून आली.
0 Comments