Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी ब्रिगेडच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप

 स्वाभिमानी ब्रिगेडच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप   
                                                     
अकलूज (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने राज्याच्या विविध भागात जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे .अशी माहिती स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी दिली.       कोरोनाच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी लॉक डाऊन बरोबरच सर्वत्र पोलिस यंत्रणा कठोर परिश्रम घेत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत स्वाभिमानी बिग्रेड संघटना नाशिक यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सुमित अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तास कर्तव्य बजावणारे पोलीस बांधवास आमच्या संघटनेने खारीचा वाटा उचलत, सकाळचा नाश्ता व पाणी बॉटल सोय करीत आहेत. संघटनेच्या आदेशावरून स्वाभिमानी बिग्रेड संघटना युवक प्रदेश अध्यक्ष सुमित भैया अहिरे, गौरव चोथे, रोशन भालेराव , निखिल शारदुल नाशिक जिल्हा यांच्यातर्फे दि २३ मार्च पासून संघटनेच्या वतीने छोटासा उपक्रम चालू आहे. तसेच माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर येथील गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे. तर पुणे येथे आमदार मोहन दादा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तर कोरोनाव्हायरस या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्र पोलीस प्रशासन नाशिक यांच्यासाठी पाण्याची बॉटल व नाष्टाची सोय सकाळ संध्याकाळ  करीत आहे आणि हा छोटासा उपक्रम  पुढेही चालूच ठेवणार आहे. असे स्वाभिमानी बिग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments