सांगोला येथील कुमार माळी यांनी कोरोना लढ्यासाठी दिला एक लाखाचा धनादेश
सांगोला ;- (जगन्नाथ साठे) सांगोला शहरातील प्रसिद्ध उद्योजक कुमार शंकर माळी यांनी सध्या सर्वत्र थैमान घालत असलेल्या कोरोना या विषाणूच्या लढ्यासाठी पंतप्रधान रिलीफ फंडाकडे एक लाख रुपयांचा धनादेश देवून राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी देशाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले.
कुमार माळी यांचे माळी पाईप इंडस्ट्रीज म्हणून प्रसिद्ध उद्योग असून नेहमीच सामाजिक,धार्मिक,आणि आध्यात्मिक कार्यात ते सहभागी असतात.सामाजिकतेचे भान ठेवून त्यांनी अनेकांना यापूर्वी ही मदत केली आहे.सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण राष्ट्रीय कर्तव्य केल्याचे समाधान लाभल्याचे मत या वेळी कुमार माळी यांनी व्यक्त केले.सध्या संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या अनेकांनी मदतीचा ओघ सुरू केला असून अनेकांनी या राष्ट्रीय आपत्ती वर मात करण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला आहे.सांगोला येथील कुमार माळी यांनी केलेल्या या मदतीमुळे सांगोला तालुक्यात आणि पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
या वेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू उद्योगपती गोविंद माळी,रमेश माळी,त्यांच्या मातोश्री पार्वती माळी, पत्नी लतिका माळी,अनिल नवले,सोहन माळी,सुजित माळी, विठ्ठल गोडसे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments