पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला बार्शीतील युवकांचा प्रतिसाद
बार्शी : सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रस्त असून भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. संपूर्ण देशात 21 दिवस लोकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बार्शीतील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन मदती साठी पुढे येत आहेत .बार्शीतील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. सुशांत चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना विरुध्दच्या लढ्याला युवा प्रतिष्ठान कडुन 31 हजार रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीत जमा करण्यात आली तसेच चिखर्डे येथील युवक अरुण रामहरी चौधरी यांनी ही चोविस हजार रुपयाची मदत सकाळ रिलीफ फंडात जमा करुन समाजासमोर खरच एक आदर्ष निर्माण केला आहे.अरुण हे बार्शीतील डॉ विलास देशमुख यांच्या हॉस्पिटल मध्दे वार्ड बॉय म्हणुन गेली विस वर्षा पासुन काम करत आहेत.हे काम करुन ते सायं.पिग्मी गोळा करण्याच देखिल काम करतात.तुम्ही काय काम करता तुमच उत्पन्न किती या पेक्षा तुमची दानत किती हेच या वरुन सिध्द होते.अरुन यांच्या या कार्याच आज सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचालित युवा प्रतिष्ठाण प्रत्येक वेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढ्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत चव्हाण यांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त अकरा हजार रुपये मदत जाहीर करत शुभेच्छा न देता कोरोना साठी मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिष्ठाणच्या वतीने व सदस्यांनी चांगला प्रतिसाद देत एका दिवसात निधी जमा केला.
युवा प्रतिष्ठानच्या वतीने या पूर्वीही 31 डिसेंबर साजरा न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, अंध, अपंग विद्यार्थी मदत, एचआयव्ही ग्रस्त मुलांना मदत, जलयुक्त शिवार योजनेसाठी आर्थिक मदत व श्रमदान, वृक्षलागवड असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कोरोनासाठीच्या मदतीसाठी अध्यक्ष सुशांत चव्हाण यांनी अकरा हजार, शिवजयंती वर्गणी मधील शिल्लक दहा हजार तसेच सदानंद गरड, शिवाजी हाके, पप्पू चव्हाण, ऋषीकेश गव्हाणे, गणेश धनवटे, अभिमान ढगे, सचिन काळे, दयानंद धुमाळ, नितीन तवटे, मोहित मस्तुद, अमोल अडाणे, नारायण केसरे, योगेश नागणे, गणेश वाघमोडे, सुहास वायकुळे, रोहित डोंगळे, अमर गाडे, सुदर्शन हांडे आदींनी मदत केली.

0 Comments