कोरोनाविरुद्धचा लढा : इंडिया विरुद्ध भारत -डॉ. बालाजी जाधव
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातही आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. अर्थात या विषाणूचे मूळ चीन आहे. चीनच्या सानिध्यात जेवढे लोक आले त्या त्या लोकांनी हा विषाणू आपापल्या देशात सुरक्षितपणे नेला. अर्थातच भारतातही हा विषाणू प्रामुख्याने परदेशस्थ लोकांमुळे अथवा परदेशी फिरायला गेलेल्या लोकांमुळे आला. आता परदेशी जाणारी माणसे ही सधन वर्गातील आहेत हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातही "विदेशातून आलेल्या सर्वांची तपासणी झालीच नाही. गेल्या दोन महिन्यात विदेशातून १५ लाख नागरिक मायदेशात आले. पण सर्वांची करोना तपासणी झालीच नाही, असं कॅबिनेट सचिवांनी म्हटलंय. विदेशातून आलेल्या नागरिकांनाच करोनाची लागण अधिक झाल्याचे समोर आले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी यासंदर्भात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. गेल्या दोन महिन्यात विदेशातून १५ लाख नागरिक मायदेशात आले. पण सर्वांची करोना तपासणी झालीच नाही. करोना तपासणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांच्या संख्येत मोठी तफावत आहे, असं कॅबिनेट सचिवांनी म्हटलंय. (maharashtra times, 28 march 2020)"
आता जिथून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे तिथे जर ही अवस्था असेल तर बाकी बोललेच न बरं.
परदेशातून आलेल्या या लोकांनी भारतातील विमान तळांवर आल्यानंतर तपासणी करून शिक्का मारून १४ दिवस एकांतात राहायला सांगितल्या नंतर त्याकडे दुर्लक्ष करून आपापले कौटुंबिक - सामाजिक व्यवहार चालूच ठेवले. काही लोक विवाह समारंभ, हळदी समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम करत राहिले. तर कनिका कपूर सारखी आंग्लविद्याविभूषित सेलिब्रेटी महागड्या पार्ट्या करत फिरू लागली. बरं त्या पार्ट्यांमध्ये भरणा कुणाचा? तर राजकीय लोकांचा. म्हणजे कनिका कपूरची पार्टी झोडेपर्यंत या राजकीय लोकांना कोरोनाचे गांभीर्यच नव्हते.
तरी एक बरे झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची पावले ओळखून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी झटत होते. केंद्रातील काही लोक कनिका कपूरच्या पार्ट्या झोडत होते तर काही लोक मध्य प्रदेशात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करत होते. नाही म्हणायला राहुल गांधींनी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबद्दल सरकारला सावध केले होते परंतु नेहमीप्रमाणे त्यांचे म्हणणे खिल्ली उडवून उडवून लावण्यात आले.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार पूर्वीपासूनच लॉकडावून सारखा पर्याय निवडण्यामध्ये लागले होते. त्यात प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या राष्ट्रीय वेळेनुसार (म्हणजे सायंकाळी आठ वाजता )२० मार्चला घोषणा केली की २२ मार्चला तमाम भारतीयांना 'जनता कर्फ्यु' पाळायचा आहे. खरेतर एवढे आव्हान करून मोदीसाहेब गप्प राहिले असते तरी चालले असते. परंतु मोदीसाहेबांचा स्वभाव हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा. ते कुणाचेही उपकार आपल्यावर ठेवून घेत नाहीत. त्या उपकाराची व्याजासहित परतफेड करतात. म्हणून आपल्या मूळ स्वभावाला जागत मोदीसाहेबांनी जे लोक आपल्यासाठी दिवसरात्र झटत आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून सायंकाळी आपापल्या गॅलरीत, खिडकीत, घरासमोर येऊन टाळ्या, थाळ्या, शंख, घंटा / घंटी ठीक पाच वाजता पाच मिनिटांपर्यंत वाजवण्यास सांगितले.
झाले. कित्येक लोकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले. काही लोकांना नवीन ज्ञान पाजळण्याची खुमखुमी सुरु झाली. त्यातच या अगाध ज्ञानाचा प्रसार करायला आयताच सोशल मीडिया हाती होता. मग काय या ज्ञानवंतांची अवस्था आधीच मर्कट त्यात दारू प्याला अशी झाली धरिता परी आवरेना अशी स्थिती झालेल्या भक्तांनी सोशल मीडियात, ध्वनी लहरींचा कोरोना व्हायरसवर कसा गंभीर परिणाम होतो, परिसरातील वातावरण कसे ऊर्जेने भारून जाते, बारा तासाच्या जनता कर्फ्युने कोरोना पसरण्याची साखळी कशी खंडित होते असे मोठमोठे सिद्धांत फिरवायला सुरुवात केली.
बरे या ज्ञानाची लागण सामान्य भक्तांना झाली असती तर समजण्यासारखे होते. परंतु शतकातील महानायक म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चनने सुद्धा ट्विट करून ध्वनी सिद्धांता मागचे विज्ञान सांगितले. अर्थात सोशल मीडियात छि थू झाल्यावर ते ट्विट तेवढ्याच तत्परतेने डिलीटही केले.
या सगळ्या बाबींचा परिणाम असा झाला की २२ मार्चला दिवसभर अतिशय कडेकोटपणे जनता कर्फ्यु पाळणारे, दिवसभरात रस्त्यावर चिटपाखरू देखील न दिसणाऱ्या वातावरणात सायंकाळी पाच वाजता अचानक बदल झाला. घराबाहेर सुरु झालेला थाळीनाद याची देही याची डोळा अनुभवावा म्हणून लोक गॅलरीतून डोकावतात न डोकावतात तोच लोकांच्या झुंडीच्या झुंडी घराबाहेर पडू लागल्या. कित्येकांच्या हातात चमचे, पळ्या, उलथने, ताटल्या, पराती आदी साहित्य होते. तर काही ठिकाणी भगोने, घंटा / घंटी, शंखही दिसू लागले. बऱ्याच ठिकाणी महिला, पुरुष, वृद्ध, लहान लेकरं नाचत बागडत रस्त्यावर उतरले. या सर्व साधनांचा आवाज कमी होतो म्हणून की काय काही लोकांनी मोठमोठ्या आवाजात गाणे वाजवायला तर काही होतकरू लोकांनी ढोल ताशे वाजवायला सुरुवात केली. काही ठिकाणची अवस्था तर एवढी भीषण होती की घरावरची पत्रे घरासमोर टाकून मोठ्या दांडक्याने त्याला सामूहिकरित्या बडवायला सुरुवात केली गेली. गावाकडे शेतकरी जसे तूर बडवतात ना अगदी तसे. ध्वनीलहरीमुळे कोरोना मरतो असे मॅसेज व्हाट्स ऍप नावाच्या विद्यापीठात प्रसारित झाल्यावर ध्वनी उत्पन्न करायला आपल्याकडे हयगयच नाही. सगळेच लोक ध्वनी उत्पन्न करत आहेत मग यात आपणच कशाला मागे राहावे? असा व्यावहारिक विचार करत काही लोकांनी गॅसचे सिलेंडर, सिंटेक्ससुद्धा बडवले. कारण एकच जेवढा आवाज मोठा तेवढा कोरोनाचा खातमा जास्त. मोदीसाहेबांचा हेतू खरेतर खूप चांगला होता की एवढ्या मोठ्या संकटात काही घटक आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करत आहेत आपण टाळ्या वाजवून किमान त्यांचे आभार तरी मानू या. परंतु सोशल मीडियात ध्वनी लहरी आणि विषाणू मारण्याचे विज्ञान यावर तत्वज्ञान पसरवले गेल्यामुळे एका चांगल्या संकल्पनेचा सत्यानाश झाला.
अहो, एके ठिकाणी तर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारीच तोंडाने शंख फुंकत फुंकत आणि दुसरे अधिकारी घंटा वाजवत वाजवत रॅलीत सहभागी झाले होते. जणू काही कोरोना व्हायरस कायमचा भारत सोडून परागंदा झाला होता. अर्थात या थाळीनादाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात तेवढ्या प्रमाणात दिसला नाही. असो. एवढे सांगून हे ध्वनी पुराण थांबवूया.
खरे तर आभार प्रदर्शन हा सर्वात शेवटचा कार्यक्रम असतो परंतु तो चुकीच्या वेळी घेतल्याने ते आभारप्रदर्शन कमी आणि स्वागत सोहळा जास्त वाटला. तसे संजय राऊत साहेब म्हणाले सुद्धा की कोरोनाला सणाचे रूप दिले म्हणून. असो.
त्यानंतर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला. म्हणजे आपण जिथे आहोत तिथेच राहणे. कुणीही घराबाहेर पडायचे नाही. कामावर जायचे नाही. शाळा, कॉलेज, कार्यालये (काही अपवाद वगळता) बस, रेल्वे विमान, कारखाने, धार्मिक स्थळे सारं काही बंद. अर्थात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे सरकारने उचललेले अत्यंत स्वागतार्ह आणि महत्वाचे पाऊल आहे. (या लॉकडाऊनचे काटेकोर पालन आपण सर्वांनी करायलाच हवे) त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरु झाली आणि ज्यांना लॉकडाऊनची अंमलबजावणी करायला अडचण जात होती त्यांना पोलिसांच्या दांडक्याने असा काही लॉकडाऊन शिकवला की त्यांच्या सात पिढ्याही आता हा लॉकडाऊन विसरणार नाहीत.
खरी भानगड इथूनच सुरु झाली. मोठमोठ्या शहरात कामासाठी सहकुटुंब गेलेल्या लोकांचे काय? त्यांना गावी कोण पोचवणार? कारखाने बंद, कार्यालये बंद उत्पन्न बंद, खानावळी बंद, मग त्यांनी खायचे काय? कामच बंद मग पैसा तरी कुठून आणायचा? असा ज्यांच्या पाचवीलाच संघर्ष पुजला आहे या लोकांनी मग निर्णय घेतला. आपल्या गावी परतण्याचा. बरं गावी जाणे तरी सोपे आहे काय? बस, रिक्षा, रेल्वे सगळेच बंद. मग गावी तरी कसे जायचे? शेवटी या भारतातील लोकांनी निर्णय घेतला की आपापली बिऱ्हाडे उचलायची, लेकरं कडेवर घ्यायची आणि काहीही करून पायीपायीच का होईना पण गाव गाठायचे.
.....आणि लाखो लोकांचे जथ्थे रस्त्यावरून चालत निघाले. थोडेथोडके नव्हे दोनशे किलोमीटर पासून ते हजार बाराशे किलोमीटर पर्यंतचा प्रवास. पायी पायी. चिल्लीपिल्ली सोबत घेऊन. खिशात पैसा नाही, पैसे असतील तर दुकाने, हॉटेल्स बंद. खायचे सुद्धा वांदे. आणि हे ही कमी म्हणून की काय कर्तव्यात दक्ष असणाऱ्या पोलिसांनी यांना रस्त्यावर का आलात म्हणून काही ठिकाणी मारझोडही केली. (ज्यांनी केली नाही त्यांचे खूप खूप आभार.) म्हणजे कोरोना देशात आणला दुसऱ्याच लोकांनी. त्यांना घरी बसा, अलग राहा म्हणताना सुद्धा ते गावभर बोंबलत फिरत कोरोनाचा प्रसाद वाटत राहिले. (सर्वच लोक नव्हे) आणि पोलिसांच्या दांडक्याचा प्रसाद मात्र या गरीब कामगारांना खावा लागला.
केंद्रीय मंत्री जावडेकर साहेबांनी लॉकडाऊन मध्ये घरी बसलेल्या लोकांसाठी खास लोकाग्रहास्तव रामायण, महाभारत हे जुने सिरीयल सुरु केले. आता किती लोकांनी याची मागणी केली होती याची प्रत्यक्ष आकडेवारी जावडेकर साहेबानाच ठाऊक. बरं रामायण मालिका सुरु करुनच जावडेकर साहेब शांत बसले नाहीत तर दुसऱ्याच दिवशी स्वगृही रामायण पाहत असतानाचा स्वतःचा फोटोसुद्धा तत्परतेने ट्विट केला. आणि लोकांना प्रश्नही केला, मी रामायण पाहतोय तुम्ही काय करताय? ज्यावेळी जावडेकर साहेब स्वतःच्या घरात बसून रामायण पाहत होते त्याचवेळी भारतातल्या लाखो कामगारांच्या जीवनात मात्र रस्त्यावर पायपीटीचे आणि उपासमारीचे महाभारत चालू होते. जावडेकर साहेब रामायण, महाभारत सुरु करा अशी मागणी करणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आकडा या हातावर पोट असणाऱ्या कामगारांचा होता हो. त्यांच्या आग्रहास्तव खास बसेसची नाही किमान गावी जाण्यापूरत्या का होईना पण काही साधनांची व्यवस्था तरी करायची ना हो. तिकडे परदेशात भारतीय लोक अडकले की त्यांना विशेष विमानाने लाखो रुपयांचा खर्च करून भारतात आणण्याची सोय केलीच ना. मग यांच्यासाठी काही हजारांचे पेट्रोल जाळायला काय हरकत होती? (बाहेर देशात अडकलेल्या लोकांना भारतात आणल्याबद्दल सरकारचे अभिनंदनच.)
तरी बरे काही स्वयंसेवी संस्था, बरेच मुस्लिम बांधव, काही सज्जन लोकांनी या कामगारांच्या खाण्यापिण्याची सोय केली. परंतू सरसकट लॉकडाऊन करण्यापूर्वी गाव सोडून पोट भरण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांचा विचार सरकारने करायलाच हवा होता. त्यांची सोय करायला हवी होती. ज्यांना कोरोना काय आहे, तो कशामुळे होतो हेच माहित नाही त्यांच्या नशिबी हकनाक हे असले आयुष्य आले. बऱ्याच ठिकाणी गावी पोचलेल्या लोकांना गावातील लोकांनी गावात घेण्यास मज्जाव केल्याच्या बातम्याही वाचनात आल्या. हे चुकीचे आहे. सर्वांना आपल्या प्राणांचे रक्षण करण्याचा हक्क आहे.
सगळीकडे स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड चालू असताना पुण्यातील स्वतःला आधुनिक चाणक्य समजणारे (अ) धर्माधिकारी यांच्या सुपीक डोक्यातून एक वेगळीच कल्पना बाहेर पडली. त्यांनी ती ट्विटरवर ओकली सुद्धा. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायची सुवर्णसंधी चालून आली आहे. अर्थात सोशल मीडियात त्यांना सोसणार नाही तेवढा डोस लोकांनी त्यांना दिला. पण विचार करन्यासारखी गोष्ट आहे इथे लाखो लोकांना घरी जाण्याची सोय नाही आणि या (अ) धर्माधिकारी यांना पाकव्याप्त काश्मीर हवाय. अवघड आहे अशा मानसिकतेचे.
हा लेख वाचून काही लोकांना प्रस्तुत लेखकाचा राग येण्याचा संभव आहे. परंतु कल्पना करा की या शेकडो किलोमीटर पायपीट करणाऱ्यात तुमची आई, तुमचे बाबा, तुमचे भाऊ, तुमची बहीण इत्यादी कुणी जिवलग लोक असते तर तुम्हाला काय वाटले असते? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजेे या कामगारांपैकी जास्तीत जास्त लोक हे हिंदूच आहेत. मग हिंदुराष्ट्रात यांची किंमत हीच राहणार आहे काय? त्यांची अशीच फरफट होणार आहे काय? तुकोबा म्हणतात, भूती नारायण खरा । आप तैसाचि दुसरा ।। खरा देव हा लोकांत आहे. जसे आपण आहोत ना तसेच इतर लोक सुद्धा आहेत. तेव्हा या लोकांकडे संतांच्या समदृष्टीने पाहूया.
असो. सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. आपण सर्वांनी मिळून एकजुटीने त्याला हरवायचे आहे. प्रशासनाला, सरकारला सहकार्य करायचे आहे आणि कोरोनाचा पराभव करायचा आहे. त्यानंतरच ज्यांनी ज्यांनी कोरोनाला हरवण्यात योगदान दिले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहे आणि ते सुद्धा कोणत्याही प्रकारच्या ध्वनी लहरी न काढता. धन्यवाद.
@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद
मो. ९४२२५२८२९०

0 Comments