अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार तिघांना पोलीस कोठडी
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] - माढा तालुक्यातील परितेवाडी येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर तुझी आई आजारी आहे,तुला बोलाविले आहे असे खोटे सांगून दोन मित्राच्या मदतीने स्विफ्ट कारमधून घरी नेऊन जबरदस्तीने लैगिक अत्याचार केल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी घडली असून भीतीपोटी बारा दिवसानी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात लैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,माढा तालुक्यातील परितेवाडी येथील अल्पवयीन मुलगी (वय-१४ वर्षे) ही वरवडे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे.ती व तिचा लहान भाऊ हे दोघे सायकल वरून दररोज ये-जा करीत होते.दि.१६ मार्च रोजी ९.३०वा.बहीण भाऊ दोघे नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत गेले होते.तर आई-वडील मोलमजुरी साठी शेतात गेले होते.त्यानंतर सदर मुलगी ही मैत्रिणी बरोबर शाळेसमोरील दुकानात गेली असता तेथे आरोपी संदीप हनुमंत चव्हाण हा आपली स्विफ्ट कार घेऊन भाऊ अनिल पवार,पोपट रमेश पवार या दोन मित्रांसह अगोदरपासून थांबला होता.त्याने संबंधित अल्पवयीन मुलीस तुझी आई खूप आजारी आहे.तुला बोलाविले आहे असे खोटे सांगून दोघींना कारमध्ये बसवून गावात घेऊन गेले.यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते.नंतर त्याच्या बरोबर असलेल्या मित्राने दुसऱ्या मुलीस सोडण्यास घेऊन गेला.यावेळी १.३० वा.सुमारास त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे नाटक करून व दमदाटी करीत जबरदस्तीने लैगिक अत्याचार केला.तसेच ही घटना कोणास सांगितली असता तुला व तुझ्या घरातील कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.तसेच मुलीस पुन्हा वरवडे येथे शाळेत नेऊन सोडले.यानंतर घरी गेल्यानंतर रडतरडत मुलीने घडला प्रकार आईस सांगितला.मात्र जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी सर्वजण गप्प राहिले.परत त्यांच्या माजी सैनिक असलेल्या दिरास ही घटना सांगितली.त्यांनी मी येतो,आल्यानंतर बघू असे सांगितले.मात्र त्यांना नंतर बंद काळात येता आले नाही.यामुळे त्यांनी ही घटना मावस दिरास सांगितली.यामुळे तब्बल १२ दिवसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल होताच टेंभुर्णी पो. नि. राजकुमार केंद्रे यांनी टेंभुर्णी पो,स्टे चे ए.पी.आय राजेंद्र मगदूम यांनी तातडीने पो.ह.स्वामिनाथ लोंढे [मेजर ] व पो.केशव झोळ ,पो.सुनिल काटे यांना या घटणेची माहीती सांगीतली यांनी या घटणेची दखल घेत वेशांतर करुण टेंभुर्णी पासुन 15 कि.मी .वर आसलेल्या परीते,परीतेवाडी,घोटी गावात जाऊन दोन तासात शिताफीने आटक करुण टेंभुर्णी पोलिसठाण्यात हजर केले असता या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करुण ज्ञायालयासमोर
उभे केले असता त्यांना ०२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेचा अधिक तपास पोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनी करीत राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.
0 Comments