Hot Posts

6/recent/ticker-posts

कामगारांच्या निवारा, भोजन व्यवस्थेसाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन

कामगारांच्या निवारा, भोजन व्यवस्थेसाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन

        सोलापूर दि. 30 :  कोरोना प्रतिबंधासाठीच्या लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील कामगारांसाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने राबवण्याची आहे.  ही सुविधा नियोजनबध्द व्हावे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी आणि उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे जिल्ह्यासाठी तर महापालिका क्षेत्रासाठी नगर अभियंता संदीप कारंजे यांची समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          याचप्रमाणे प्रत्येक तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षेतेखाली तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, दिपक शिंदे, जिल्हाप्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हाउपनिबंधक कुंदन भोळे, प्रादेशिक साखर सहसंचालक दराडे, सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील समितीचे सदस्य सचिव आहेत.

          दोन्ही समितीने स्वयंसेवी, धर्मादाय, सहकारी, खासगी आदी संस्थांकडून मदत घेवून कामगारांना अन्न व धान्य उपलब्ध करुन द्यावे. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा, मदत व पुनवर्सरन विभागामार्फत मिळालेल्या निधीतून मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे. विस्थापित मजुरांसाठी निवारागृहाची व्यवस्था करावी यासाठी जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या शाळा, महाविद्यालय, समाजमंदीर, मंगल कार्यालय निश्चित करावीत. या ठिकाणी कम्युनिटी किचनच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

          यासाठी नियुक्त समन्वय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे 1) दिपक शिंदे उपजिल्हाधिकारी, मोबाईल 9960600975 email id slao1solapur@gmail.com 2) शैलेश सुर्यवंशी उपजिल्हाधिकारी, मोबाईल 7588327994 email id shaileshsurya777@gmail.com 3) संदिप कारंजे, शहर अभियंता सोलापूर महापालिका मोबाईल 9923752375 email id sbkaranje70@gmail.com.

            तालुकास्तरावर मदत देऊ तयार असणा-या दानशूर व्यक्तींनी संबंधित तहसिलदारांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यानी केले आहे. तहसिलदारांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :-  1)  श्री. जयवंत पाटील,  उत्तर सोलापूर, 0217-2731014, 9823722274 2) श्री. अमोल कुंभार, दक्षिण सोलापूर, 0217-2731033, 7249052004 3) श्री. प्रदीप शेलार, बार्शी, 02184-222213,  9881977866  4) श्रीमती अंजली मरोड,  अक्कलकोट, 02181-220233,  9921948007  5) श्री. चव्हाण,  माढा, 02183-234031, 9028861778  6) श्री. समिर माने,  करमाळा, 02182-220357, 9405860348 7) श्रीमती वैशाली वाघमारे, पंढरपूर, 02186-223556,  9881791009  8) श्री. जीवन  बनसोडे, मोहोळ, 02189-232234,  9764007579 9) श्री. स्वप्निल रावडे, मंगळवेढा, 02188-220241, 7385764330  10) श्री. योगेश  खारमाटे, सांगोला, 02187-220218, 9765599599 11) श्री. अभिजीत  पाटील,  माळशिरस, 02185-235036, 7719955855.
Reactions

Post a Comment

0 Comments