संकट काळात मदत करणे हे माझे कर्तव्य : चेतनसिंह केदार-सावंत
सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष नगरसेवक चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी स्वखर्चातून सांगोला शहरात पाच ट्रॅक्टरच्या माध्यमातून ब्लोअर द्वारे जंतुनाशकाची फवारणी करत सांगोला शहर निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
राज्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. 15 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केल्याने संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून भाजपचे तालुकाध्यक्ष नगरसेवक चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी संपूर्ण सांगोला शहर निर्जंतुकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवारी नगरसेवक चेतनसिंह ऊर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी स्वखर्चातून पाच ट्रॅक्टरच्या माध्यमातून ब्लोअर मशीनद्वारे शहरात जंतुनाशकाच्या फवारणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक जुबेर मुजावर रफिक तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते राजू मगर, शाहरुख तांबोळी, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे , दीपक केदार, सुनील केदार, रोहित सावंत आदी उपस्थित होते.
नगरसेवक चेतनसिंह केदार सावंत यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकातून कौतुक केले जात आहे. नागरिकांनी नगरपालिका निवडणुकीत निवडून देत शहराचा विकास करण्याची संधी दिली. त्या नागरिकांसाठी आपण संकटकाळात मदत करणे कर्तव्य आहे. ही जबाबदारी ओळखून नगरसेवक चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी संपूर्ण सांगोला शहर निर्जंतुकीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
0 Comments