अकलूज ग्रामपंचायतीने स्वयंचलित हॅन्ड वॉश बसविले
अकलूज ( प्रतिनिधी ) कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी विविध प्रयत्न चालू असताना, अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या कल्पनेतुन अकलूजच्या विविध भागांत हात स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलीत हॅन्ड वॉश किट बसविण्यात आले आहेत. भाजी मंडई, उदयरत्न टाऊन शिप,भाजी मंडई मच्छी मार्केट,इनामदार हॉस्पिटल, अकलूज उपजिल्हा रुग्णालय व पोलीस स्टेशन गेट, आदी ठिकाणी किट बसविण्यात आले असून, सदर किटला हाताचा स्पर्श न करता केवळ पायांचा वापर करत हाताची स्वच्छता करता येत आहे.यामुळे नागरिकांनी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या कामाचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले. तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी कुठे ही स्पर्श करू नका...आपले हात स्वच्छ ठेवा व काळजी घ्या.अनावश्यक घरातून बाहेर पडू नका.आपली काळजी हीच कुटुंबाची काळजी.
आपल्या आरोग्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत असा संदेशही सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी नागरिकांना दिला.
0 Comments