दक्षिणमधील आरोग्यकेंद्रांना आ. सुभाष देशमुखांची भेट ;कोरोना प्रतिबंधासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव, भंडारकवठे, आनंद नगर येथील आरोग्य केंद्रात माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी भेट देऊन कोरोना संदर्भातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कराव्या लागणार्या उपाययोजनेबाबतचा आढावा घेतला. यासाठी लागणारे मनुष्यबळ असो वा आर्थिक मदत असो सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आ. देशमुख यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नुकतेच त्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि भाजप पदाधिकार्यांबरोबर दूरध्वनीबाबत संवाद साधत गावातील समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी त्यांनी दक्षिण तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांना भेट घेऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. कोणतीही अडचण आल्यास लगेच संपर्क साधावा, आपण सर्व मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी आ. देशमुख यांनी सुरक्षा धोक्यात घालून जनसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणार्या डॉक्टर, परिचारक, वार्डबॉय, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक तसेच सुरक्षारक्षक व पोलिसांचे कौतूक करत स्वतःची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले.
0 Comments