Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगलकडून जनता कर्फ्यूतही कर्तव्याचे पालनअन्नपूर्णा योजनेतून ५०० डब्यांचे घरपोच वाटप

लोकमंगलकडून जनता कर्फ्यूतही कर्तव्याचे पालन; अन्नपूर्णा योजनेतून ५०० डब्यांचे घरपोच वाटप
 सोलापूर : संपूर्ण देशासह सोलापुरातही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू सुरु असताना लोकमंगलने अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात ५०० डब्यांचे वाटप केले. अशा परिस्थितीतही आपल्या कर्तव्याचे पालन केल्याने लाभार्थ्यांनी लोकमंगलचे आभार मानले. शहरातील विविध भागातील निराधार, अपंग, बेघर असलेल्या सुमारे ५०० लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून लोकमंगलर्फे जेवणाचा डबा घरपोच करण्यात येतो. रविवारी कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जनता कर्फ्यू होता. त्यामुळे डब्यांच्या वितरणाबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र अन्नपूर्णा योजनेच्या प्रमुख शुभांगी भोसले, फौंडेशनचे प्रमुख संदिप पिसके यांनी नियोजन करून सर्व कर्मचार्‍यांना सकाळी लवकर बोलावून घेत नियोजित वेळेच्या एकतास आधी सर्व डबे तयार करून घेतले. शहरातील विविध भागात असलेल्या कोणत्याही लाभार्थ्याला घराबाहेर पडू न देता रिक्षाने प्रत्येकाच्या घरपोच डबे दिले. याकामी विजया साठे, मंदा पांढरे, श्यामसोलंकर, सायबण्णा कोळी, राजेश जाधव, रिक्षा चालक लक्ष्मण गवळी यासह कमर्चार्‍यांचे सहकार्य लाभले.
Reactions

Post a Comment

0 Comments