Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 31 मार्चपर्यंत बंद* कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुलगुरू डॉ. फडणवीस यांचे आदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 31 मार्चपर्यंत बंद कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुलगुरू डॉ. फडणवीस यांचे आदेश 

सोलापूर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले आहेत. या काळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावे, असे निर्देशही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी रविवारी दुपारी परिपत्रक काढून यासंदर्भात सूचना केल्या आहेत. यानुसार कोरोना साथीच्या पार्श्वभमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या 31 मार्चपर्यंत विद्यापीठ परिसर बंद ठेवण्यात येणार आहे, असे घोषित करण्यात आले आहे . या काळात विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग बंद राहतील.शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाला रोखण्यासाठी या संदर्भाचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील आदेश वैद्यकीय विभाग, तातडीची सेवा देणारा विभाग, सुरक्षा विभाग इत्यादींच्या विभागप्रमुखांना ज्यांची सेवा अत्यावश्यक वाटत असल्यास त्याबाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. सदरील आदेश दिनांक 31 मार्च, 2020 पर्यत आपत्कालीन परिस्थिती म्हणुन लागू केले आहेत. याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती वाटल्यास ज्यांना बोलावण्यात येईल, त्यांना विद्यापीठात उपस्थित राहणे बंधनकारक असेल. याचबरोबर विद्यापीठाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येतील, त्या सर्वांनी पाळणे बंधनकारक राहील, असे कुलसचिव डॉ. घुटे यांनी म्हटले आहे.31 मार्चपर्यंत विद्यापीठ परिसर बंद राहील, याची नोंद सर्व संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी व सर्व संबधितांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
चौकट
शिक्षकांनी घरी राहून शैक्षणिक आराखडा तयार करावा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील अध्यापनाचे कार्य  बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक घरीच आहेत. एमएचआरडीच्या निर्देशानुसार शिक्षकांनी घरी राहून पुढील शैक्षणिक वर्षाचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्नही सर्व शिक्षकांनी करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांशी संपर्क साधून ऑनलाईन अभ्यास करावा, असेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments