Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीत 'जनता कर्फ्यु' ला ;सकाळी सहा वाजल्यापासूनच रस्त्यावर शुकशुकाट

टेंभुर्णीत 'जनता कर्फ्यु' ला ;सकाळी सहा वाजल्यापासूनच रस्त्यावर शुकशुकाट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज टेंभुर्णीत   जनता कर्फ्यूलोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं प्रशासनाने केलं आवाहन


टेंभुर्णी [प्रतिनिधी ]:-कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला टेंभुर्णी शहरात सकाळी सहा वाजताच सुरुवात झाली.सकाळी व्यायाम,मॉर्निंग वॉक व फिरायला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळले. दिवस उजाडताच रस्त्यावर,  होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे टेंभुर्णी शहरात सकाळी सहा वाजल्यापासूनच अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. या निर्णयाला टेंभुर्णी  पोलिसांकडून काटेकोर पालन केले जात असलेले दिसुन आले सकाळी नऊवाजल्यापासुन टेंभुर्णी शहरातुन जानारा रास्ट्रीयमहामार्ग मुंबई -हैद्राबाद ,इंदोर --बेंगलोर , जाणाऱ्या वाहणा कमी दिसत होत्या    तसेच मराठवाड्याचेश प्रवेश द्वार म्हणुन टेंभुर्णी शहराची ओळख असलेल्या पुणे-लातुर, सातारा -लातुर -नांदेड,बिड,तुळजापुर ,परभणी, आशा मराठवाड्यात जाणाऱ्या रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता टेंभुर्णी एस. टी. बसस्थानक परिसर,  मार्केट यार्ड, बेंबळे चौक,  कुर्डुवाडी चौक, टिळक रोड,  मेन रोड,  करमाळा चौक,  अकलूज चौक, राजमाता जिजाऊ कुर्डूवाडी रोड  उड्डाणपूल चौक, करमाळा रोड उड्डाणपूल चौक, या  नेहमी  गजबजलेल्या चौकात दिवसभर शुकशुकाट दिसून आला सोने-चांदी दुकाने,  ऑटोमोबाईल्स, मशनरी, हॉटेल, पानटपऱ्या, कापड दुकाने, यासह विविध प्रकारची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये,दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे कालपासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले.मात्र आदेशानंतरही ज्यांनी दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत,ती बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले.त्यामुळे टेंभुर्णी शहर आणि ग्रामीण भागात भिमानगर ,शिराळ ,आढेगाव,रांजणी, उजनी ,बेंबळे,परीते,वेणेगाव ,चव्हाणवाडी ,मिटकलवाडी,माळेगाव ,सापटणे ,तांबवे ,आकोले , अशा आनेक गावात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला.कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये,एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे,यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments