Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी पंचायत समिती सज्ज गटविकास अधिकारी संतोष राऊत

कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी पंचायत समिती सज्ज 
गटविकास अधिकारी संतोष राऊत
सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना दिल्या महत्वाच्या सूचना.

सांगोला (प्रतिनिधी) कोरोना विषानूला पायबंद घालण्यासाठी सांगोला पंचायत समिती सज्ज झाली असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी व पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत असे प्रतिपादन सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले.त्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून आलेली व्यक्ती अथवा  परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली व्यक्ती यांनाच quarantine ( विलगीकरण )करणे जरुरीचे आहे,मुंबई, पुणे किंवा इतर परगावातून आलेल्या व्यक्तीस अगर खोकला, ताप, धाप लागणे यापैकी काहीही लक्षणे असल्यास त्यास जवळच्या प्रा. आ. केंद्र येथे संपर्क करण्यास सूचित करावे. वैद्यकीय अधिकारी सदर व्यक्तीची  प्राथमिक तपासणी आणि उपचार  करतील आणि संशयित वाटल्यास /गरज लागल्यास पुढील तपासणी आणि उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवती, परदेशातून न आलेल्या व्यक्तीला किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीला कोणतीही आजाराची लक्षणे दिसत नसतील तर त्यांना विलगिकरण(Quarantine) करण्याची आवश्यकता नाही किंवा इतर तपासणी करण्याची आवश्यकता नाही,आलेल्या व्यक्तीला जर काही लक्षणे दिसत असतील तरच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करणे योग्य आहे. सरसकट सर्व व्यक्तींची तपासणी करणे आवश्यक नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.मात्र अशा व्यक्तींनी पुढील 14 दिवस घरीच थांबावे, बाहेर फिरू नये, याची दक्षता घ्यावी.अशा सूचना ही करण्यात आल्या आहेत असेही शेवटी राऊत यांनी सांगितले
Reactions

Post a Comment

0 Comments