Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजमध्ये जनता कर्फ्यूला उत्फूर्तपणे प्रतिसाद

अकलूजमध्ये जनता कर्फ्यूला उत्फूर्तपणे प्रतिसाद


अकलूज ( प्रतिनिधी ) महाभयानक आशा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये अकलूजच्या जनतेने जनता कर्फ्यूला उत्स्फूर्तपणे उदंड प्रतिसाद दिला असून अकलुज गावातील रस्ते निर्मनुष्य दिसत होते.
          कोरोना सारख्या महाभयंकर प्राणघातक विषाणूने जगभरात तांडव घातला आहे. या विषाणूने कित्येकांना विळख्यात घेऊन अनेकांचे जीवन उध्वस्त केले आहे. या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी अखंड देशातून शर्तीचे प्रयत्न चालू असून शासन प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. तर कोरोना सारख्या अदृश्यशक्तीचा सामना करण्यासाठी व येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता ३१ मार्चपर्यंत सर्व व्यवहारही थांबले आहेत. ह्या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तर त्याला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे  आवाहन करताच अकलूजकरांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्तपणे उदंड प्रतिसाद दिला. रोजच्या गजबजलेल्या गावात अभूतपूर्व शांतता पाहायला मिळाली. अत्यावशक सेवेसह अकलुज गावामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये सन्नाटा पसरला होता. गल्लीबोळातील रस्तेही निर्मनुष्य झाले होते. लहान-थोर  आणि वयोवृद्ध नागरिकांनी घरातच बसून जनता कर्फ्यूला  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments