राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ च्या घरात तर एकाचा मृत्यू
मुंबई:-महाराष्ट्रात कोरोनाग्रस्ताची दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ च्या घरात गेली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. मुंबईत ५६ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीने परदेशातून प्रवास केल्याची माहिती आहे.
मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी २१ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
दरम्यान आज राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये १० जणांची वाढ झाली आहे. यामध्ये मुंबईतील सहा, तर पुण्यातील चार रुग्णांचा समावेश आहे.पिंपरी चिंचवडमध्ये 12, नागपूर, यवतमाळ, कल्याणमध्ये प्रत्येकी 4, नवी मुंबईत 3, अहमदनगरमध्ये 2 आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरीत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

0 Comments