Hot Posts

6/recent/ticker-posts

गरज पडल्यास खासगी डॉक्टरांची सेवा घेणार : जिल्हाधिकारी शंभरकर

गरज पडल्यास खासगी डॉक्टरांची
सेवा घेणार : जिल्हाधिकारी शंभरकर 



            सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यकता  पडल्यास शहरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणू ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था केली जाईल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आयएमए च्या पदाधिका-यांना केले. त्यावर पदाधिका-यांनी प्रशासनाला पूर्ण मदत करण्याची ग्वाही श्री.  मिलिंद शंभरकर यांना दिली.
            जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आयएमए च्या पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदिप कुमार ढेले, आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यकता भासल्यास शहरातील पाच खासगी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करावे लागतील. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 25 बेडची आयसोलेशनसाठी सुविधा करावी लागेल. यासाठी आएमए च्या सदस्य डॉक्टरांसोबत चर्चा करावी, असे शंभरकर यांनी सांगितले.  
            यावर इंडियन मेडिकलच्या अध्यक्षा डॉ. पुष्पा अग्रवाल यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिक जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहेत,  असे सांगितले. यावेळी इंडियन मेडिकलचे सचिव डॉ. वच्चे, डॉ. रायचुर, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. सचिन मुळे, डॉ. दिलीप आपटे, डॉ. पागे, डॉ. ज्योती हिरेकेरुर, डॉ. प्रसाद केळकर, डॉ. संजय मंटाळे,  डॉ. सुदिप सारडा, डॉ. गुंडेटी आदी उपस्थित होते.
            दरम्यान, जिल्ह्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. मात्र कोणी साठेबाजी केल्याची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. परराज्यातून जिल्ह्यात         येणा-या सुमारे 627  वाहनांची आणि 2000 नागरिकांची तपासणी केली. बंदी आदेश व इतर आदेशांचे उल्लंधन करणा-यांविरुध्द 330 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments