बापरे ‘करोना व्हायरस’नंतर ‘हंता व्हायरस’… चीनमध्ये एकाचा मृत्यू; ३२ जणांची घेण्यात आली चाचणी
🎙 करोनामुळे जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमधील वुहान येथून पसरत गेलेल्या या विषाणूचा संसर्ग आता १०० हून अधिक देशांमध्ये पोहचला आहे. युरोपीयन देशांबरोबरच आशियामधील अनेक देश करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. असं असतानाच आता चीनमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा (Hantavirus) संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
करोनाप्रमाणे हंतानेही महामारीचे स्वरुप धारण करु नये अशा अर्थाचे ट्विटस अनेकांनी केले आहे. अनेकांनी या बातमीनंतर हंता विषाणूंबद्दल सर्च करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा हंता विषाणू नक्की काय आहे?, हा कसा पसरतो? याची लक्षणे काय यासंदर्भात सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे.
🔹 हंता नक्की आहे तरी काय?
तज्ज्ञांच्या मते हंता विषाणू हा करोनाइतका घातक विषाणू नाहीय. करोनानुसार हा संसर्गाने पसरत नाही. उंदीर किंवा खारीच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार, “घरामध्ये उंदीर असतील तर हंता विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अगदी ठणठणीत व्यक्तीही उंदरांच्या संपर्कात आल्यास त्याला हंता विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.”
करोनाप्राणे हंता विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून एखाद्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्यास त्याला हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
🔹हंताची लक्षणे काय?
हंताचा संसर्ग झाल्यास व्यक्तीला ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, अतीसार ही हंताची प्रमुख लक्षणे आहेत. उपचार करण्यास उशीर झाल तर हंतामुळे फुफुसांमध्ये पाणी साचतं. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
🔹हंता किती धोकादायक?
सीडीसीच्या माहितीनुसार हंतामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो इतका हा विषाणू धोकादायक आहे. हंताची लागण झालेल्यांचा मृत्यूदर ३८ टक्के इतका आहे. चीनमधून जगभऱात पसलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यादाच हंतामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने जगभरातील नेटकऱ्यांनी सोशल मिडियावरुन चिंता व्यक्त केली आहे. करोनामुळे जगभरामध्ये आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ८० हजारहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे.

0 Comments