Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपालिकेच्या वतीने शहरात ब्लोअर मशिनद्वारे निर्जंतुकीकरण फवारणी

 सांगोला नगरपालिकेच्या वतीने शहरात ब्लोअर मशिनद्वारे निर्जंतुकीकरण फवारणी :
      सांगोला नगरपालिकेचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्तुत्य उपक्रम...


सांगोला (जगन्नाथ साठे);- सर्व जगामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले असताना सांगोला नगरपालिकेने सांगोला वासीयांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी सांगोला शहर आणि उपनगरात पाच ट्रॅकटर्स च्या साह्याने ब्लोअर मशीनच्या मदतीने शहरातील प्रमुख रस्ते,सार्वजनिक ठिकाणे,चौक आदि ठिकाणी निर्जंतुकिकरण फवारणीस सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या समोर दानशूर शेतकऱ्यांनी सामाजिक भान ठेवून या ब्लोअर मशीन नगरपालिकेला उपलब्ध करून दिल्या.

      या वेळी नगराध्यक्षा राणीताई माने,आरोग्य सभापती छायाताई मेटकरी,बांधकाम सभापती सुनिता खडतरे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे,नगरसेवक चेतनसिंह केदार, अस्मिर तांबोळी,दादा खडतरे,रफिक तांबोळी,आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संबधीत शेतकऱ्यांचे आभार नगराध्यक्षा राणीताई माने,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,नगरपालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी मानले. 
    या निर्जंतुकिकरण फवारणीत प्रामुख्याने टेम्पर,जर्मक्लिक,सोडिअम हायक्लोराईड यांचे मिश्रण तयार करून वापरले जाणार आहे,या मुळे सांगोला शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे,सांगोला शहरातील नागरिकांनी अति महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,घाबरू नका पण दक्ष रहा असे आवाहन आरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांनी केले आहे. यावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments