आष्टी तलावामध्ये उजनी धरणाचे पाणी सोडावे असा अश्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवानंद अण्णा गुंड पाटील यांनी देले.
आष्टी तलावातील पाणीची पातळी १०% पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे एप्रिल - मे मध्ये २२ गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. सध्या उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी चालू असून दूरदृष्टी ठेऊन आत्ताच आष्टी तलावामध्ये पाणी सोडावे असा आग्रह जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व औदुंबर पाटील कारखान्याचे मुख्यप्रवर्तक मा. श्री. देवानंद अण्णा गुंड पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला.
उपभियांता जाधव साहेब यांच्या कडून माहिती घेतल्यानंतर पुढील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे चाल असणारा आवर्तनातून किलो मीटर ९५ मधून पाणी सोडण्याची गरज आहे. याचे निवेदन संबंधित मंत्री महोदयांना पण पाठविली आहेत.

0 Comments