कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विनाशुल्क घरपोच सेवा...कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जवळे गावचा ऐतिहासिक, निर्णय जवळेगावचा आदर्श तालुक्यातील सर्वच गावांनी घ्यावा...मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील जवळा गावचा पहिला उपक्रम..कोरोना हद्दपार होईपर्यंत गावपरिसरात साळुंखे-पाटील कुटुंबियांकडून मोफत सॅनिटायझरची फवारणी
सांगोला प्रतिनिधी : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. अशा जनतेसाठी विनामूल्य अन्न पुरवण्याची सेवा सांगोला तालुक्यातील जवळा गावात प्रथमच सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये आणि नागरिकांनी घरातच बसून राहावे, अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या किराणा बाजार व भाजीपाला देखील जागेवरच घरबसल्या मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांनी एकत्रित येवून मोठा निर्णय घेतला आहे. आता जवळा व परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला घरपोच देण्यात येणार आहे. यासाठी जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी प्रत्येक दुकानदार व व्यापाऱ्यांचा मोबाईल नंबर देण्यात आला आहे. यावर कॉल केल्यास जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.
जवळा व परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या व व्यापारी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये व्यापाऱ्यांची कमिटीमार्फत नागरिकांना अन्नधान्य , भाजीपाला, किराणा, भुसार, पाण्याचे जीआरम ऑटोमोबाईल्स, नाभिक, परीट, मटन, चिकन, अंडी यासह इतर जीवनावश्यक वस्तू, दूध उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डाचा वितरण आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये वॉर्डमधील वितरकाचे संपर्क नंबर प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या संपर्क नंबरवर नागरिकांनी फोन करून आपल्याला काय हवं आहे याची माहिती दिली तर त्या नागरिकाला घरपोच सर्व साहित्य आणि वस्तू पोहच केल्या जाणार आहेत. सदर लॉक डाऊन संपत नाही तोपर्यंत होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गरजेच्या वस्तूसाठी घरा बाहेर पडू नये. विक्रेत्याशी संपर्क साधून आपल्याला ज्या वस्तू , साहित्य, भाजीपाला लागणार आहे याबाबत माहिती द्यावे त्यांच्याकडून त्याच दरात विनाशुल्क आपल्याला घरपोच साहित्य दिले जाईल असे सांगत, या घरपोच सेवा उपक्रमामुळे नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी टाळता येणार आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला घरामध्ये बसून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. तसेच नागरिकांची देखील गैरसोय दूर होणार आहे. असे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले आहे.
0 Comments