Hot Posts

6/recent/ticker-posts

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा' उल्लेख पूर्ण करावा- प्रा. बाळासाहेब सरगर

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा' उल्लेख पूर्ण करावा- प्रा. बाळासाहेब सरगर 
सांगोला/प्रतिनिधी- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा' उल्लेख पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूर असा न करता  'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर' असा  पूर्ण करावा. विद्यापीठातील जे जातीयवादी कर्मचारी असतील किंवा काही जातीयवादी न्यूज पेपरवाले असतील ते ह्या विद्यापीठाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करतात व महामानवांची नावे विद्यापीठाला देणे या गोष्टीला हरताळ फासतात. यातूनच पुढे जातीय वाद निर्माण होतात असे होऊ नये यासाठी सर्व न्यूज पेपरवाले व विद्यापीठातील कर्मचारी यांनी विद्यापीठाचा उल्लेख करताना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर' असाच करावा. 
           ‘सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा’ या विद्यापीठाचा उल्लेख आता एस.एम विद्यापीठ बडोदा असा केला जातोय तो तसा करू नये तसेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई’ चा उल्लेख आता सी.एस.टी असा केला जातोय तो तसा करू नये. तसेच ‘कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूरचा’ उल्लेख आता के.बी.पी कॉलेज पंढरपूर असा केला जातोय तो तसा करू नये तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चा उल्लेख आता बामू असा केला जातोय तो तसा करू नये. अशा पद्धतीने शासनाने दिलेल्या नावाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जातोय. अशी अवस्था 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरची' होऊ नये त्यासाठी विद्यापीठातील सर्व कर्मचारी  व न्यूज पेपरवाले यांनी विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख करताना पूर्ण करावा. अन्यथा सर्व प्रकारच्या सामाजिक संघटना व सर्व प्रकारच्या राजकीय संघटना उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील. असे मत सम्राट सेना सरसेनापती प्रा. बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments