Hot Posts

6/recent/ticker-posts

जीवनावश्यक वस्तुंचा साठा आढळून आला तर मनसे स्टाईलने उत्तर देवू - तालुका उपाध्यक्ष अक्षय विभूते

जीवनावश्यक वस्तुंचा साठा आढळून आला तर मनसे स्टाईलने उत्तर देवू - तालुका उपाध्यक्ष अक्षय विभूते

सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला  शहर व तालुक्यातील किराणा दुकानदार व भाजी विक्रेते यांना मनसेच्या वतीने विनंती करण्यात येते की, संपूर्ण देशात व महाराष्ट्रामध्ये  कोरोना सारख्या  महाभयंकर आजाराने  थैमान घातले असून अशा वेळी सर्वसामान्य जनतेसाठी म्हणून सरकारने जीवनावश्यक वस्तू चा साठा नागरिकांपर्यंत पोहोचावा, म्हणून  प्रशासन व पोलीस बांधव हे सहकार्य करत आहेत अशा वेळी  सांगोला शहरांमधील व  तालुक्यातील काही किराणा दुकानदार व भाजीपाल्या विकणारे हे लोकांकडून दुप्पट पैसे घेताना च्या तक्रारी येत आहेत, जर या पुढील काळात , ज्या किमतीमध्ये वस्तू आहेत त्याच किमतींमध्ये विका जास्त किंमत लावून विकू नका, भाजीपाला  विकणार्‍यांनी याबाबतीत काळजी घ्यावी. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून नागरिकांना सहकार्य करावे,  सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून किराणा दुकानांमधील   वस्तू व भाजीपाला विकण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल,असे ही अक्षय विभूते यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments