नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलन पेटले
खासदारांचा येडेश्वरी शुगर कारखाना पाडला बंद
बार्शी (कटूसत्य वृत्त):- शेतकरी संघटनेच्या नवीन वर्षाची सुरुवात आंदोलनाने झाली असून ज्या ज्या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल 3000 च्या पुढे जाहीर केलेली नाही अशा साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेची राज्यभर आंदोलने सुरू असून आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शीतील येडेश्वरी साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गव्हाणीत उड्या टाकून कारखाना बंद पाडण्यात आला.
यावेळी समाधान शिंदे, रणजीत शिंदे, अशोक कारकर, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष किरडे, विजय शिंदे, आकाश नवले, हनुमंत शिंदे, नागेश शिंदे, श्रीधर शिंदे, प्रफुल्ल खैरे, नितीन शिंदे, विजय डमरे, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, नारायण तनपुरे, बाबा सांगडे, अनिल शिंदे, विष्णु शिंदे, गणेश नवले, अश्रूबा मोरे, शहाजी अडसूळ, सत्यवान शिंदे, श्रीहरी शिंदे, सिताराम लोंढे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
शेवटी रात्री उशिरा उर्वरित रक्कम देणे संदर्भात दिनांक ९ जानेवारी ते १२ जानेवारीच्या दरम्यान सोनवणे यांचे सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी शंकर गायकवाड म्हणाले की, ठरल्याप्रमाणे 12 जानेवारीच्या आत उर्वरित दोनशे रुपये व अंतिम दर 3500 चे आश्वासन न दिल्यास, 12 जानेवारी नंतर कुठलेही निवेदन न देता पुन्हा कारखाना बंद करणार असल्याचा इशारा यावेळी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
पांगरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

0 Comments