संचार बंदी लागू असल्याने विनाकारण बाहेर फिरू नये;अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल : सूर्यकांत कोकणे
मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): जगभरासह भारत देशात आपण सर्व सध्या कोरोनाविरोधात युद्ध लढत असून यामध्ये आपण यशस्वी व्हायचे असेल तर सर्वांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून घरामध्येच थांबणे गरजेचे आहे. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यक्ती बाहेरून येतील त्यांनी आपली आरोग्य तपासणी स्वतःहून करून घेणे गरजेचे आहे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका अन्यथा मोहोळ तालुक्यातील जनतेला पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिला आहे.
२३ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये १४४ कलम लागू झाले असून यामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसू शकत नाहीत तसेच संचारबंदी असल्याकारणाने कोणीही बाहेर फिरू नये. शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत असून भाजीपाला व्यवसायिकांनी सकाळी सात ते नऊ यावेळी मध्येच आपल्या बसण्या मध्ये अंतर ठेवूनच आपल्या मालाची विक्री करावी त्याचप्रमाणे
अत्यावश्यक सेवेमधील किराणा दुकानदारांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत आपली दुकाने ग्राहकांसाठी उघडावीत तसेच ग्राहकांची जास्त गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे गर्दी टाळण्यासाठी किराणामाल घरपोच देण्याची व्यवस्था करावी असे यावेळी पो.नि.कोकणे यांनी सांगितले.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याला हद्दपार करण्यासाठी सांघिक प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येकाने शासनाला सहकार्य करून आपल्या घरी थांबावे त्याचप्रमाणे बाहेरून जे नागरिक आलेले आहेत त्यांनी आपल्या व इतरांच्या संरक्षणासाठी स्वतःहून आपली आरोग्य चाचणी करून घ्यावी. संचार बंदीचे आदेश लागू असल्याकारणाने विनाकारण बाहेर फिरू नये असे दिसल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही शेवटी पोलीस अधीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिला आहे.
0 Comments