Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजमध्ये जनसेवा संघटनेने भरविला मायेचा घास

 अकलूजमध्ये जनसेवा संघटनेने भरविला मायेचा घास            
   
                              
अकलूज( प्रतिनिधी ) डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बेघर, गोरगरीब, बाहेरगावावरून बंदोबस्तासाठी आलेले पोलिस बांधव यांना अन्नदेवून मायेचा घास भरवित आहेत.                                                    
           कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखंड देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. ज्यांचे हातावरील पोट आहे, असे कुटुंबही पोटाला चिमटा घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी घरात बसूनच सज्ज झाले आहेत. तर जे बेघर आहेत, गोरगरीब आहेत अशा लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, जनसेवा संघटनेने एक पाऊल पुढे टाकत अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.       
                          डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली  महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांचे वतीने  सदरचा उपक्रम हा माळशिरस तालुक्यातील सर्व गावामध्ये सुरू करण्यात आला असुन,  ज्या त्या गावातील पोलीस स्टेशन, तसेच बेघर, गोरगरीब अशांना  जनसेवा संघटनेचे त्या गावातील कार्यकर्ते  फुड पॅकेट ,अन्नदान १४ एप्रिल  पर्यंत करणार असल्याची माहिती जनसेवा संघटनेने दिली. 
Reactions

Post a Comment

0 Comments