Hot Posts

6/recent/ticker-posts

करोनाच्या पार्श्वभूमीवर बाळेगावत सोशल डिस्टनसिंग ठेवून रक्तदान शिबिर संपन्न...

करोनाच्या पार्श्वभूमीवर बाळेगावत सोशल डिस्टनसिंग ठेवून रक्तदान शिबिर संपन्न...



महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमातून सध्या देशामध्ये कोरोना सारख्या महामारीमुळे रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने सर्व जनतेने रक्तदान करून आपल्या देशासाठी देशकार्य करावे हे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत JRCP वॉरिअर्स, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर आणि  RSS सोलापूर  यांच्या संयुक्त विद्यमाने बाळे येथील क्षीरसागर गॅलरी मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
  फक्त प्रसार माध्यमातून म्हणजेच फेसबुक आणि व्हाट्सएप द्वारे ही रक्तदान विषयीची माहिती दिली. याला बाळे गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. 
या शिबिरास बाळे गावात सकाळी १०:०० वाजल्यापासून  ते दुपारी १:०० वाजेपर्यंत सुमारे ३६ जणांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन रक्तदान  करून देशसेवेसाठी हातभार लावला. 
कोरोना च्या विळख्यात जग वाहून जात असताना भारतामध्ये सुद्धा त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हाच तुटवडा दूर करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            या शिबिरात मदन क्षिरसागर, शितल बोराडे, विकास कस्तुरे, दीपक ओतारी, प्रशांत कांचन, आनंद पोपळघट, मल्लिनाथ गजभार, महादेव डोंगरे, गणेश कणकधर, कृष्णा थोरात, गणेश कांबळे, सोमानंद डोके, सुरेश क्षिरसागर, महादेव डोंगरे, संतोषभाऊ धाकपाडे, गणेश गडेकर, शक्ती सुरवसे, बाबा शेख, सिकंदर बिराजदार, दीपक मस्के, सचिन कवाडे, रोहन धर्मशाळे,  गणेश हुल्लूर, रमेश क्षिरसागर,  JRCP वॉरिअर्स, नेचर काँझर्वेशन सर्कल सोलापूर, राष्ट्रीय स्वयंसेवक आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांनी अथक परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments